धुळे/नंदुरबार, 6 मार्च : राज्यात सगळीकडे होळी साजरी होत असताना उत्तर महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यात मात्र गारपीट झाली आहे. याचा एक व्हिडीओ समोर आला असून कोणलाही हे काश्मीर असल्याचे वाटू शकते. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात प्रचंड गारपीट झाली आहे. पाच वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या या गारपिटीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
धुळे जिल्ह्यातील खोरी टिटाने परिसरामध्ये प्रचंड गारपीट झाली. गारपिटीनंतर काश्मीरसारखी सर्वत्र बर्फाची चादर पसरलेली पाहायला मिळाली. एक तास चाललेल्या गारपीटीने परिसरात शेतमालाचे मोठं नुकसान केलं आहे. सर्व रस्ते तसेच शेत शिवारात जोरदार गारपीट झाली. तर तिकडे तर नंदुरबार जिल्ह्यातील खोरी, आष्टे विभागात जोरदार गारपीट झाली. जिल्ह्यात नंदुरबार, आकलकुवा, शहादा, तळोदा आणि नवापूर मध्ये शेतीच मोठं नुकसान झालं आहे.
हा काश्मीर नाही तर महाराष्ट्र आहे. #kashmir #nadurbar pic.twitter.com/sYBpUgP2vX
— News18Lokmat (@News18lokmat) March 6, 2023
या जिल्ह्यात पावसाची शक्यता
पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, बीड आणि उत्तर मध्ये महाराष्ट्रात सध्या पावसाची शक्यता आहे. तर बदलापूरलाही हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
होळी धुळवड उत्सव निसर्गाचा
बऱ्याच ठिकाणी तुरळक हलक्या स्वरुपातील सरी कोसळण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. सध्या कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात 6 व 7 मार्च रोजी हलक्या पावसाचा अंदाज आहे. सध्या पुण्यात सकाळी व सायंकाळनंतर किमान तापमान कमी असल्याने गारवा जाणवत आहे.
View this post on Instagram
कोकण, गोवा व विदर्भातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात किमान तापमान साधारण 16 अंश सेल्सिअस असल्याने सकाळी व रात्री गारवा जाणवत आहे. तसेच दिवसभरही ढगाळ वातावरण असल्याने दुपारी खूप कडक उन्हाचा त्रास होत नसल्याचे दिसून येत आहे.
हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. कृष्णानंद होसळीकर म्हणाले, ‘‘सध्या पुण्याच्या हवामानाचा वेगळा अनुभव येत आहे. एकीकडे गारवाही जाणवत आहे आणि दुसरीकडे दुपारी उन्हाचा कडाका वाढत आहे. राज्यात काही भागात ढगाळ वातावरण दिसत आहे. तसेच येत्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्र, दक्षिण मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.’’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.