मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बापरे, पुराच्या पाण्यामुळे मगर पोहोचली थेट लोकांच्या घराजवळ, सांगलीतला LIVE VIDEO

बापरे, पुराच्या पाण्यामुळे मगर पोहोचली थेट लोकांच्या घराजवळ, सांगलीतला LIVE VIDEO

आज कर्नाळजवळ नागरी वस्तीत मगर मुक्त विहार करताना आढळून आली.

आज कर्नाळजवळ नागरी वस्तीत मगर मुक्त विहार करताना आढळून आली.

आज कर्नाळजवळ नागरी वस्तीत मगर मुक्त विहार करताना आढळून आली.

सांगली, 25 जुलै : सांगलीमध्ये (sangali flood) पावसामुळे हाहाकार उडाला आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे आता मगरी सुद्धा बाहेर आल्या आहे.   नागरी वस्तीत मगरी (Crocodiles) मुक्त विहार  करू लागल्या आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे.

सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक भागाला पुराचा वेढा बसला आहे. पाणी नदी पात्राच्या बाहेर पडले आहे. अनेक मगरी नागरी वस्तीत आल्या आहेत. आज कर्नाळजवळ नागरी वस्तीत मगर मुक्त विहार करताना आढळून आली. एका परिसरात मगर मुक्तपणे फिरत असल्याचे समोर आले आहे. हा संपूर्ण प्रकार समोर असलेल्या एका इमारतीतून एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आहे.

पुराच्या पाण्यात मगर दिसू लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे घराच्या बाहेर निघण्यास लोकांना मनाई करण्यात आली आहे.

दरम्यान, 24 तारखेला सुद्धा मगर मानवी वस्तीत आढळली होती. खरंतर, कृष्णा नदीत मगरींचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. पण पुराच्या पाण्यामुळे (Flood water) या मगरी (Crocodiles) वाहत मानवी वस्तीत आल्या आहेत. आता सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला पावसानं उसंत दिल्यानं पाण्याची पातळी ओसरत आहे. अशात सांगली जिल्ह्याच्या वाळवा परिसरातील लक्ष्मी नगर भागात रस्त्यावर मगर फिरताना स्थानिक नागरिकांना आढळली आहे. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

लक्ष्मीनगर परिसरात राहणाऱ्या एका नागरिकांनं मगर रस्त्यावर फिरत असतानाचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल झाला आहे.

First published: