मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सांगलीतील द्राक्ष आणि डाळिंब निर्यातदाराला कोट्यवधी रुपयांचा गंडा, दुबईतील कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल

सांगलीतील द्राक्ष आणि डाळिंब निर्यातदाराला कोट्यवधी रुपयांचा गंडा, दुबईतील कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल

दुबईतील कंपनीने द्राक्ष आणि डाळिंब निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्याला 1 कोटी 36 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

दुबईतील कंपनीने द्राक्ष आणि डाळिंब निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्याला 1 कोटी 36 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

दुबईतील कंपनीने द्राक्ष आणि डाळिंब निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्याला 1 कोटी 36 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

सांगली, 14 सप्टेंबर : द्राक्षे आणि डाळिंब निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यास दुबईतील कंपनीने (Dubai based company cheated with Sangli Businessman) तब्बल एक कोटी 36 लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी दुबईतील कंपनीच्या दोन मालकांसह मुंबईतील दोघा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Case registered in Vishrambaug Police Station) करण्यात आला आहे.

पौर्णिमा पाटील या सांगलीमधील उत्तर शिवाजी नगर येथे कुटुंबासह राहतात. त्यांची पीव्हीआयपी एक्सपोर्ट एलएलपी सांगली नावाने आयात, निर्यात करणारी कंपनी आहे. ते द्राक्षे, डाळिंब, नारळ, तांदुळ मालाची खरेदी करून निर्यात करताता. 2019 मध्ये दुबईतील ओपीसी फुडस्टफ कंपनीचा पर्चेस ऑफिसर माजीद जलाल याने मोबाइलवरून संपर्क साधून मालाची चौकशी केली. त्यावेळी पौर्णिमा यांनी कंपनीविषयी सारी माहिती दिली. त्यावेळी दिलीप जोशी हा मुंबई परिसरासाठी काम पहात असल्याचे जलाल याने सांगितले.

Wardha : बोट उलटून 11 जण बुडाले, मृतक आणि बेपत्ता नागरिकांची नावे

त्यानंतर पौर्णिमा यांनी पतीसह डिसेंबर 2019 मध्ये जोशी याची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी संशयित मंगेश गांगुर्डे हा भारतातील काम पाहत असल्याने त्यावेळी ओळख झाली. त्यानंतर फिर्यादी हे मजीद जलाल आणि कंपनीला भेट देण्यासाठी दुबईला गेले. त्यावेळी कंपनीचा मालक मुहम्मद फारूक, बद्र अहमद हुसेन यांची ओळख झाली. माल निर्यातीसाठी पन्नास टक्के रक्कम आगाऊ व मालाचे कंटेनर ‘युएई’मध्ये मिळाल्याने उर्वरित रक्कम देण्याचा व्यवहार ठरला. त्यानुसार जानेवारी 2021 मध्ये ऑर्डर मिळाली. द्राक्षाचे चार आणि डाळिंबाचे तीन असे सात कंटेनर निर्यात केले. ज्याची किंमत एक कोटी 57 लाख इतकी होते.

त्यावेळी तीस टक्के रक्कम फिर्यादी यांना देण्यात आली. उर्वरित रक्कमेसाठी जलाल याच्याशी संपर्क केले. त्यावेळी त्याने चालढकलपणा करण्यास सुरूवात केली. फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार दुबईतील कंपनीच्या दोघा मालकांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

दुबईतील ओपीसी फुडस्टफ ट्रेडिंग एलएलसी कंपनीचा मालक मुहम्मद फारूक, बद्र अहमद जुमा हुसेन या दोघांसह मुंबईतील व्यवस्थापक दिलीप जोशी, व्यवस्थापक माजीद जलाल, अर्थसहाय प्रमुख मंगेश गांगुर्डे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

First published:
top videos

    Tags: Sangli