आम्ही सर्वांचे पैसे परत करणार- डीएसकेंचं आश्वासन

आम्ही सर्वांचे पैसे परत करणार- डीएसकेंचं आश्वासन

त्यांची परिस्थिती सुधारत आहे अशीही माहिती डीएसकेंनी दिली आहे. 'आम्ही सकारात्मक दिशेनं काम करत आहोत. तर आम्ही सगळ्यांचे पैसे देणार आहोत'

  • Share this:

पुणे, 21 नोव्हेंबर:  आम्ही सगळ्यांचे पैसे परत करणार  आणि पळून जाणार नाही असं आश्वासन आज डीएसकेंनी दिलं आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

त्यांची परिस्थिती सुधारत आहे अशीही माहिती डीएसकेंनी दिली आहे. 'आम्ही सकारात्मक दिशेनं काम करत आहोत. तर आम्ही सगळ्यांचे पैसे देणार आहोत'. आणि डीएसकेंनी कुणाला फसवलेलं नाहीये असं डीएसकेंनी पत्रकार परिषदेत सांगितलय.

तसंच मी मल्ल्यांसारखा पळून गेलेलो नाही असंही ते यावेळी म्हणाले आहेत. सर्वांना दिलासा देण्यासाठी आपण  आल्याचं विधानही डीएसकेंनी केलं. मीडियालाही विश्वासात घ्यावं यासाठी ही मीटींग घेण्यात आलेली आहे, असंही ते म्हणाले आहेत.  तर कुणाचंही नुकसान होणार नाही, आम्ही सर्वांचे पैसे परत करणार आहोत हा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

डीएसकेंनी गेले  अनेक महिने ठेवीदारांचे पैसे परत केले नाहीत. म्हणून अखेर गुंतवणूकदारांनी  त्यांच्यविरूद्ध पोलिसात तक्रार केली. त्यानंतर त्यांच्या राहत्या घरावर छापे पडले. त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टात दाखल केला. तो अखेर हायकोर्टात मंजूर झाला. त्यानंतर लोकांना आश्वासन देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली होती.

First published: November 21, 2017, 12:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading