मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

डी एस कुलकर्णींच्या गाड्यांचा लवकरच लिलाव, BMW 80 तर पोर्शे 75 लाखात होणार विक्री!

डी एस कुलकर्णींच्या गाड्यांचा लवकरच लिलाव, BMW 80 तर पोर्शे 75 लाखात होणार विक्री!

या 13 गाड्यांमध्ये बीएमडब्ल्यू, पोर्शे, टोयोटो अशा अलिशान गाड्यांचा समावेश आहे.

या 13 गाड्यांमध्ये बीएमडब्ल्यू, पोर्शे, टोयोटो अशा अलिशान गाड्यांचा समावेश आहे.

या 13 गाड्यांमध्ये बीएमडब्ल्यू, पोर्शे, टोयोटो अशा अलिशान गाड्यांचा समावेश आहे.

पुणे, 29 जानेवारी : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी अर्थात डीएसके सध्या अटकेत आहेत. त्यांच्यावर गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. गुंतवणूकदारांचे पैसे बुडवल्याप्रकरणी जेलमध्ये अडी.एस.कुलकर्णींच्या गाड्यांचा लिलाव होणार आहे.

डीएसकेंच्या 20 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 13 अलिशान गाड्यांचा लिलाव (DSK vehicles auction) करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या 13 वाहनांची किंमत 2 कोटी 86 लाख 96 हजार इतकी आहे. येत्या 15 फेब्रुवारीला हा लिलाव होणार आहे.

मावळचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी या गाड्यांच्या लिलावाचे आदेश दिले आहेत. या 13 गाड्यांमध्ये बीएमडब्ल्यू, पोर्शे, टोयोटो अशा अलिशान गाड्यांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यता कोर्टाने या गाड्यांच्या लिलावाला परवानगी दिली होती. बीएमडब्ल्यू गाडीची किंमत 85 लाख रुपये आहे, तर  पोर्शे या गाडीची किंमत 75 लाख रुपये इतकी आहे.  एमव्ही ऑगस्टाची किंमत 25 लाख रुपये इतकी आहे. तर टोयाटो कॅमेराची किंमत 8 लाख रुपये इतकी आहे.

कोर्टाने दिले होते आदेश

पोलिसांनी फेब्रुवारी व मार्च 2018 मध्ये डीएसकेंच्या 20 आलिशान गाड्या जप्त केली होत्या. यात 19 चारचाकी तक एक दुचाकी आहे. या गाड्या पडून पडून खराब होत असल्याने पोलिसांनी गाड्या विकून पैसे ठेवीदारांना देण्यात उपयोगी पडणार असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर विशेष न्यायाधीश ए. एस. भैसारे यांच्या कोर्टाने हा आदेश दिला होता. अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त डॉ.शिवाजी पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गव‌‌ळी यांनी ही कामगिरी केली होती.

मृत्यूस डीएस कुलकर्णी जबाबदार.. म्हणत पुण्यात 'शिवसैनिक' ठेवीदाराची आत्महत्या

दरम्यान, 17 जानेवारी 2020 रोजी डीएस कुलकर्णी यांच्या एका ठेवीदाराने आत्महत्या केली आहे. तानाजी गणपत कोरके (वय-60) असे या ठेवीदाराचे नाव होते. तानाजी कोरके हे पुण्यातील घोरपडी येथील भीमनगर परिसरात राहात होते. त्यांनी मुलीच्या लग्नासाठी डीएसकेमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र, गुंतवणूक केलेली रक्कम मिळत नसल्याने तानाजी यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून आयुष्य संपवले. तानाजी कोकरे शिवसैनिक होते. तानाजी यांचे एक पत्र सापडले असून त्यावर शेवटी शिवसैनिक....जय महाराष्ट्र! असा उल्लेख आहे. कोरके यांच्या पश्चात चार मुली आहेत.

तानाजी कोकरे यांनी 2014 मध्ये आपल्या दोन मुलींच्या लग्नासाठी स्वतःच्या नावे चार लाख तर नातवंडांच्या शिक्षणासाठी जावयाच्या नावे पन्नास हजार रुपये रक्कम डीएसके डेव्हलपर्स यांच्याकडे गुंतवणूक केली होती. 2017 मध्ये त्याची मुदत संपल्यावर रकमेसाठी अनेकदा पाठपुरावा केला. तिसऱ्या मुलीचे लग्न पाहुण्यांकडून उसणे पैसे घेऊन केले. मात्र, चौथ्या मुलीचे लग्नासाठी पैसे कोठून आणायचे? अशी चिंता कोकरे यांना सतावत होती. या चिंतेतून आपण आयुष्य संपवत असल्याचे कोकरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

First published:

Tags: Ds kulkarni, DSK, Pune