पुणे विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये सुरू होती दारू पार्टी, विद्यार्थ्यांना ताब्यात घेतानाचा LIVE VIDEO

पुणे विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये सुरू होती दारू पार्टी, विद्यार्थ्यांना ताब्यात घेतानाचा LIVE VIDEO

सुरक्षा कर्मचारी तिथे गेले असता या मद्यपान केलेल्या मुलांना बाहेर येण्यास सांगितलं. पण त्यांनी रूमचा दरवाजा उघडण्यास नकार दिला.

  • Share this:

पुणे, 23 फेब्रुवारी : शिक्षणाचं माहेर घर म्हणून पुण्याची ओळख आहे. परंतु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये काही विद्यार्थ्यांनी दारू पिऊन धिंगाणा घातल्याची लाजीरवाणी घटना समोर आली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

शनिवारी राञी साविञीबाई फुले पुणे विद्यापीठातील होस्टेल क्रमांक 9 मधील एका रूमध्ये काही विद्यार्थी हे दारू पित होते. दारूच्या नशेत हे विद्यार्थी धिंगाणा घालत होते. त्यांच्या या प्रतापाबद्दल काही जणांनी तक्रार केली.

काही विद्यार्थी दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याची तक्रार आली होती त्यानंतर विद्यापीठाचे सुरक्षा कर्मचारी तिथे गेले असता या मद्यपान केलेल्या मुलांना बाहेर येण्यास सांगितलं. पण त्यांनी रूमचा दरवाजा उघडण्यास नकार दिला. तेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडण्याचा पविञा घेताच विद्यार्थ्यांनी दार उघडले. त्यानंतर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय.

दरम्यान, सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून याबद्दल खुलासा करण्यात आला. विद्यापीठातील हॉस्टेल क्र. ९ मधील एका खोलीत विद्यार्थी दारू पीत आहे. असा फोन काल (२२ फेब्रुवारी) रात्री ११ वाजता सुरक्षा विभागाला आला. त्यावरून सुरक्षा विभागाचे कर्मचारी आणि हॉस्टेलचे अधिकारी तेथे पोहोचले. त्यांनी संबंधित विद्यार्थ्याला पोलिसांच्या हवाली केलंय. संबंधित विद्यार्थ्यावर निलंबनाच्या कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसंच, होस्टेलच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे, अशी माहिती कुलसचिव यांनी दिली.

 

राज ठाकरेंच्या बांगलादेशी मोहिमेचा फज्जा, ताब्यात घेतलेले तिघे निघाले भारतीय

दरम्यान, पुण्यात मनसेच्या ऑपरेशन बांगलादेशी मोहिमेचा फज्जा झाला आहे. शनिवारी बांगलादेशी सल्याच्या संशयावरून तीन जणांना ताब्यात घेतलेलं भारतीय निघाले आहेत. पुणे पोलिसांनी तिघांनाही सोडून दिलं आहे. झाल्या प्रकाराबद्दल तिघानांही नाहक मनस्ताप झाला. या तिघांनीही कालच भारतीय असल्याचं म्हटलं होतं. पण तरीदेखील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

पुण्याच्या धनकवडीतील बालाजीनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बांग्लादेशी घुसखोरांचा शोध सुरू केला होता. शनिवारी सकाळी मनसेचे तब्बल 50 कार्यकर्ते पुण्यातील बालाजीनगर परिसरात नागरिकांचे ओळखपत्र तपासत होते. त्यातील तीन संशयित बांगलादेशी घुसरखोरांना मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. पण ते आता भारतीय असल्याचं समोर आलं आहे.

ताब्यात घेतलेले तिघेही कुटुंब धनकवडीतील बालाजीनगरमध्ये राहतात. त्यांनी आम्ही बांगलादेशी नसून पश्चिम बंगालचे असल्याचा दावा केला होता. तशी ओखळपत्रंही त्या कुटुंबाकडून दाखविण्यात आली होती. याबाबत पोलिसांनी पुढील चौकशी सुरू केली. त्यात ते भारतीय असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मनसेच्या मोहिमेचा फज्जा उडाला असंच म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pune
First Published: Feb 23, 2020 09:41 PM IST

ताज्या बातम्या