मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दारूच्या नशेत बापाने 2 वर्षांच्या मुलीला भिंतीवर आपटून संपवलं

दारूच्या नशेत बापाने 2 वर्षांच्या मुलीला भिंतीवर आपटून संपवलं

अंजलीला आईकडून हिसकावून घेऊन तो निघून गेला आणि गावातील ग्रामपंचायत इमारतीच्या भिंतीवर त्याने अंजलीला आपटले.

अंजलीला आईकडून हिसकावून घेऊन तो निघून गेला आणि गावातील ग्रामपंचायत इमारतीच्या भिंतीवर त्याने अंजलीला आपटले.

अंजलीला आईकडून हिसकावून घेऊन तो निघून गेला आणि गावातील ग्रामपंचायत इमारतीच्या भिंतीवर त्याने अंजलीला आपटले.

    मुजीब शेख, नांदेड, 17 आॅक्टोबर : दारूच्या नशेत पित्याने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलीला भिंतीवर आपटले. गंभीर जखमी झालेल्या मुलीच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील वाघी गावात घडली. हिमायतनगर तालुक्यातील वाघी गावात राहणाऱ्या 37 वर्षीय प्रभाकर इंगळे याला दारूचे व्यसन आहे. 16 ऑक्टोबर रोजी दुपारी तो नेहमीप्रमाणे दारू पिऊन आला. दारूच्या नशेत त्याने पत्नीशी वाद घालायला सुरुवात केली. यावेळी दोन वर्षाची अनुराधा उर्फ अंजली आईच्या कडेवर होती. अंजलीला आईकडून हिसकावून घेऊन तो निघून गेला आणि गावातील ग्रामपंचायत इमारतीच्या भिंतीवर त्याने अंजलीला भिंतीवर आपटले. डोक्याला जबर मार लागल्याने अंजली बेशुद्ध पडली. तिला हिमायतनगरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. ती कोमात गेल्याचं आरोग्य केंद्रातील डॉक्टरानी सांगितलं. प्रकृती गंभीर असल्याने अंजलीला नांदेडला जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णवाहिकेतून नांदेडला उपचारासाठी आणताना वाटेतच अंजलीचा मृत्यू झाला. 17 ऑक्टोबर रोजी मयत अंजली हिच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाली. यावेळी आई अर्चना इंगळे हिने स्वता:हुन फोन करून ही संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. हिमायत नगर पोलिसांनी तातडीने अर्जना इंगळे हिचा जबाब नोदवून गुन्हा दाखल केला. आरोपी बाप प्रभाकर इंगळेला पोलिसांनी अटक केली. प्रभाकर इंगळेला दोन मुली होत्या. चिमुकल्या अनुराधाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
    First published:

    Tags: Daughter, Nanded, दारू, नांदेड, हिमायतनगर

    पुढील बातम्या