Home /News /maharashtra /

धक्कादायक! MD ड्रग्सची पुण्यात निर्मिती, मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या

धक्कादायक! MD ड्रग्सची पुण्यात निर्मिती, मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या

MD ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी राकेश उर्फ रॉकी खनिवडेकर आणि तुषार काळे या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

पिंपरी चिंचवड, 21ऑक्टोबर: MD ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी राकेश उर्फ रॉकी खनिवडेकर आणि तुषार काळे या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तर झुबी उडिको नामक नायझेरियन व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पोलिस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. रांजणगाव MIDC परिसरातील संयोग बायोटेक प्राव्हेट लिमिटेड कंपनित MD ड्रग्स निर्मिती करत असल्याचं उघड झालं आहे. तयार केलेला 112 किलो ड्रग्स बाजारात विकल्याची आरोपींची कबुलीही दिली आहे. ड्रग्स विकून जमवलेले 85 लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. हेही वाचा...मोठी बातमी, एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबद्दल राष्ट्रवादीकडून थोड्याच वेळात घोषणा पोलिसांनी सांगितले की, या आरोपींपैकी दोघे नोएडाच्या एका फार्मा कंपनीत काम करतात. चौकशीत समोर आले की, त्यांना केमिकल आणि औषधाची चांगलीच माहिती होती आणि हे ड्रग्स एका फॅक्टरीमध्येच तयार करत होते. हे पाहची आरोपी चाकन शीक्रापुर रोडवरुन जात असताना पोलिसांना यांच्या कारच्या काळ्या काचवरुन संशय आला आणि त्यांनी कारची तपासणी केली. यात त्यांना कारमध्ये ड्रग्स आढळून आले. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले की, अटक झालेले आरोपी उत्तर प्रदेशच्या नोएडा आणि महाराष्ट्रातील पुणे आणि जळगावचे आहेत. त्यांच्याजवळ 20 किलोग्राम मेफेड्रोन ड्रग्स सापडले, ज्याला 'म्याऊं म्याऊं' ओळखले जाते. चेतन फक्कड दंडवते, आनंद गीर मधु गीर गोसावी, अक्षय काळे, संजीव कुमार राउत आणि तौसिफ हसन मोहम्मद तस्लीम अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, 7 ऑक्टोबरला अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ व पथकानं चाकण पोलीस स्टेशन हद्दीत 20 किलो मेफेड्रोन हे 20 कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. गुन्ह्याच्या तपासाची व्याप्ती पाहाता पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश साहेब यांनी पोलीस उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा तपास पथकांची स्थापना केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. नारकोटिक्स विभागाने गुरुवारी एका मोठ्या कारवाईत पुण्यातून 20 कोटी रुपयांचे मेफेड्रोन ड्रग्स जप्त केले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 5 आरोपींना अटक झाली आहे. हेही वाचा...लवकरच मिळेल सकारात्मक बातमी.. मेगाभरतीबाबत रोहित पवारांनी दिले संकेत बॉलिवूडशी संबंध? नारकोटिक्स विभागाला संशय आहे की, या चौघांचा बॉलिवूडशी संबंध असू शकतो. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासात समोर आले आहे की, पुणे आणि आसपासच्या परिसरात होणाऱ्या रेव पार्टीसाठी हे ड्रग्स मागवले होते.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Pune news

पुढील बातम्या