Tik Tok चा आणखी एक बळी, कृष्णा नदीच्या पुरात व्हिडीओ बनवताना तरुण बुडाला

Tik Tok चा आणखी एक बळी, कृष्णा नदीच्या पुरात व्हिडीओ बनवताना तरुण बुडाला

धीरज कृष्णा नदीच्या पुरात आपल्या मित्रांसोबत टिक टॉकचा व्हिडिओ बनवत असताना वाहून गेल्‍याची माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

  • Share this:

किरण मोहिते, (प्रतिनिधी)

सातारा, 3 ऑगस्ट- सांगलीनंतर आता साताऱ्यातील मर्ढे येथील टिक टॉकच्या नादात आणखी एक बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धीरज तुकाराम शिंगटे असे या युवकाचे नाव आहे. धीरज कृष्णा नदीच्या पुरात आपल्या मित्रांसोबत टिक टॉकचा व्हिडिओ बनवत असताना वाहून गेल्‍याची माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मर्ढे येथील पुलावरून कृष्णा नदीच्या पुरात सुमारे दहा ते पंधरा मित्रांसोबत धीरज शिंगटे पुलावरून उडी मारली. पण नदीमध्ये पाण्याच्या प्रवाहात पोहोताना धीरजला दम लागला आणि तो पुराच्या पाण्यात गटांगळ्‍या खाऊ लागला. तो बुडत असल्‍याचे पाहून त्‍याच्या मित्रांनी त्याला हात देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या आधीच तो पाण्यात बुडून दिसेनासा झाला. सध्या मर्ढे येथील गावकरी कृष्णा नदीच्या काठावरुन साळवण, लिंब, गोवे, वनगळ परिसरात फिरून धीरजचा शोध घेत आहेत. मात्र, अद्याप धीरज सापडला नाही. शोधकार्य थांबवले असून ट्रेकर्सच्या मदतीने उद्या सकाळी पुन्हा शोध घेतला जाणार आहे.

दरम्यान, टिक टॉक व्हिडीओची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. पण काही जणांना टिकटॉक व्हिडिओ चांगलेच महागात पडले आहे. अगदी नोकरी गमावण्याची वेळ काही जणांवर आली आहे. टिक टॉक व्हिडिओमुळे गेल्या आठवड्यात दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

पिवळ्या साडीवाल्या 'त्या' महिला ऑफिसरचा Tik Tok Video व्हायरल

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये सहाव्या टप्प्यातील मतदनादरम्यान चर्चेत आलेल्या पिवळ्या साडीतील निवडणूक अधिकारी रिना द्विवेदी सर्वांच्याच लक्षात राहिल्या. निवडणुकीनंतरही त्यांची क्रेझ सर्वत्र वाढत गेली. त्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. रिना यांनी उत्तर प्रदेशातील देवरियामधील मतदार संघातून आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांसोबत सेल्फी देखील घेतला. लखनऊमध्ये राहत असलेल्या रिना द्विवेदी मतदानाकरता आपल्या सासरी देवरिया इथं दाखल झाल्या. यावेळी त्यांनी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन केलं होतं. त्यानंतर रीना यांचा एक टिक टॉक व्हिडिओ व्हायरल झाल्यानं त्या आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

रिना व्दिवेदी यांचा एक टिक टॉक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओमधील रिना यांचा डान्स हरियाणाची डान्सर सपनी चौधरीची कॉपी म्हटलं जात आहे. या व्हिडिओमध्ये रिना हिरव्या साडीमध्ये सपना चौधरीप्रमाणं डान्स स्टेप करताना दिसत आहे. यामध्ये त्यांनी सपनाचं ‘तेरी आख्या का काजल’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सर्वांच्या पसंतीत उतरत आहे. हा व्हिडिओ कोणत्यातरी लग्नात शूट करण्यात आला आहे. ज्यामध्ये रिना कोणत्याही अभिनेत्री पेक्षा कमी दिसत नाही. या व्हिडिओमध्ये रिना यांनी सपनापेक्षाही चांगला डान्स केल्याचं काहींचं म्हणणं आहे.

SPECIAL REPORT: ऑन ड्युटी टिक टॉक VIDEO करण्याच्या नादात गमावली नोकरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2019 09:13 PM IST

ताज्या बातम्या