दुष्काळाच्या झळा लग्नालाही, चारा छावणीतच गुरांच्या साक्षीने लागलं लग्न

दुष्काळाच्या झळा लग्नालाही, चारा छावणीतच गुरांच्या साक्षीने लागलं लग्न

शेतकऱ्यांच्या मुलींची लग्न लावून देण्यासाठी 'आई' चारा छावणीने दिला मायेचा हात.

  • Share this:

बालाजी निरफळ  उस्मानाबाद 29 मे : दुष्काळ हा माणसाच्या जीवावर उठलाय याच दुष्काळाने घरा दारातील मुलीची लग्न होत नसल्याने अनेक शेतकरी आपल्या गळ्या भोवती मृत्यूचा फास आवळून जीवनयात्रा संपवतात. याच संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी तेर मधील आई चारा छावणी पुढे सरसावली आहे. दुष्काळात गरीब शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी त्यांनी चारा छावणी वरच उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन मुलीचा विवाह लावून दिला.

माळ रानावरील जनावरांच्या चारा छावणीत लग्नाच्या कमानी लागल्याने शेतकऱ्यांच्या चेहेऱ्यावर समाधान कित्येक दिवसांनी समाधान दिसलं. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील आई चारा छावणीत जनावरे घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या मुलीची लग्न ही याच चारा छावणीत पार पडत आहेत. लग्नासाठी वाजंत्री, जेवण नवरा नवरीचे कपडे वऱ्हाड्यांची सोय अशा सगळ्यांची सोय या चारा छावणीच्या माध्यमातून करण्यात आली होती.

चारा छावणी आलेल्या शेतकऱ्यांच्या मुलीची जमलेली लग्न पैसेच नसल्याने ही लग्न मोडण्यापर्यंत गेली होती पण चारा छावणी वर याची चर्चा झाली व श्रद्धा सामाजिक संस्था संचलित आई चारा छावणी चे संस्था चालक व शेतकऱ्यांनी हे दोन्ही विवाह चारा छावणी वर लावून देण्याचा निर्णय घेतला.

या अनोख्या लग्न सोहळ्याला तेर मधील गावकरी मान्यवर पुढारीही उपस्थित होते. दुष्काळाच्या काळात केवळ चारा छावणी चालवणे उदिष्ट नसून खऱ्या अर्थाने  शेतकरी जगला पाहिजे हाच उदिष्ट ठेवून हा विवाह सोहळा आयोजित केल्याची माहिती छावणीचे मालक सतीश सोमाणी यांनी दिलीय.

जिल्ह्यात दुष्काळटं संकट मोठं आहे. या चारा छावणीने जो आदर्श घालून दिला तसेच उपक्रम इतर चारा छावण्यांवरही आयोजित करण्यात येणार असल्याचं नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितंल. यासाठी सरकारकडून मदत मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितंल.

First published: May 29, 2019, 6:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading