मुंबई, विवेक कुलकर्णी, 20 जून : गेल्यावर्षी झालेला कमी पाऊस आणि यंदा लांबणीवर पडलेल्या मान्सूनमुळे राज्याला पाणी टंचाईचा भीषण सामना करावा लागत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई आहे. अनेक भागांमध्ये सारी मदार ही टँकरवर आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनामध्ये पाण्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारला लक्ष्य केलं. पाणी नियोजन करण्यामध्ये सरकारनं सावळा गोंधळ केला. पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याचा फटका सध्या सहन करावा लागत आहे. खडकवासला, टेमघर धरणांमध्ये पाणीसाठी कमी आहे. त्यामुळे पुणे परिसराला पाणी मिळत नाही. याला जबाबदार कोण? याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी अजित पवार यांनी केली. दरम्यान, राज्यातील अनेक धरणांनी तळ गाठल्याचं चित्र आहे.
या कारणांमुळे काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांना आहे पसंती
गिरीश महाजनांचं उत्तर
प्रश्नोत्तराच्या तासामध्ये अजित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं. मे 2019 अखेर मराठवाड्यातील धरणांमध्ये असलेल्या पाणीसाठ्याची माहिती यावेळी महाजन यांनी दिली. 11 मोठ्या प्रकल्पांमध्ये 1.94 टक्के पाणीसाठा आहे. तर, 75 मध्यम प्रकल्पांमध्ये 1.27 टक्के पाणीसाठा असून 749 लघु प्रकल्पांमध्ये 1.65 टक्के पाणीसाठा असल्याची माहिती यावेळी गिरीश महाजन यांनी दिली.
तर, मागील 5 वर्षामध्ये शेतकरी सर्वात खुश आहे. सर्वांना पाणी मिळत आहे. पाण्याचं ढिसाळ नियोजन नसून एनटीपीसी पाईपलाईननं सोलापूरला पाणी देण्यात येणार आहे. येत्या 2-3 महिन्यात हा प्रश्न मार्गी लागेल.
मदार पावसावर
राज्यात सध्या भीषण पाणी टंचाई आहे. दुष्काळानं होरपळणाऱ्या राज्यातील जनतेची सारी मदार आता पावसावर आहे. वायू चक्रीवादळामुळे राज्यात होणारं मान्सूनचं आगमन हे लांबलं असलं तरी येत्या 48 तासात मान्सून राज्यात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
VIDEO: भररस्त्यात बैलांच्या झुंजीचा थरार; नागरिक हैराण