जाणता राजा असो किंवा त्यांचा कोणी पंटर भरचौकात चर्चा करायला तयार- चंद्रकांत पाटील

जाणता राजा असो किंवा त्यांचा कोणी पंटर भरचौकात चर्चा करायला तयार- चंद्रकांत पाटील

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना खुले आव्हान दिले आहे. 'जाणता राजा असो किंवा त्यांचा कोणी पंटर, आपण दुष्काळाबाबत भरचौकात चर्चा करायला तयार आहोत, अशा शब्दांत चंद्रकांत पाटलांना शरद पवारांना आव्हान दिले आहे.

  • Share this:

सागर सुरवसे (प्रतिनिधी),

सोलापूर, 10 मे- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना खुले आव्हान दिले आहे. 'जाणता राजा असो किंवा त्यांचा कोणी पंटर, आपण दुष्काळाबाबत भरचौकात चर्चा करायला तयार आहोत, अशा शब्दांत चंद्रकांत पाटलांना शरद पवारांना आव्हान दिले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुष्काळाच्या राजकारणावरुन शरद पवारांना खुले आव्हान केले. जाणता राजा असो किंवा त्यांचा कोणी पंटर असो दुष्काळात राज्यात चारा कमी आहे की जास्त याबाबत भरचौकात त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार असल्याचा पवित्रा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील घेतला आहे. ते आज सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ सांगोला आणि मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी दौऱ्यावर आलेत. त्यावेळी त्यांनी शरद पवारांना खुले आव्हान दिले.

पुढे बोलताना ते म्हणाले, राज्यात 1 लाख एकरवर चारा लावला गेला आहे. त्यामुळे जूनपर्यंत पुरेल इतका चारा राज्यात उपलब्ध आहे. दुष्काळात शेतकऱ्याला दिलासा द्यायला हवा, मात्र सत्ताधाऱ्यांना काही कळत नाही, असे बोलणे चुकीचे आहे. दुष्काळावरुन राजकारण करणाऱ्यांना माझे आव्हान असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या 'त्या' विद्यार्थ्यांना न्याय देणार-महसूलमंत्री

मराठा आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या वैद्यकीय पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना सरकार न्याय देणार,असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी कोटा वाढवून मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारला पत्र देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

सुप्रीम कोर्टाने वैद्यकीय पदव्युत्तरच्या प्रवेशासाठी मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नसल्याचा निर्णय दिल्यानंतर राज्यशासनाकडून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या 200 विद्यार्थ्यांना राज्य शासन न्याय देणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 200 पैकी 100 विद्यार्थ्यांना मेरिटनुसार ओपनमधून प्रवेश मिळू शकतो तर उर्वरीत 100 पैकी किमान 40 विद्यार्थ्यांना प्रवेश न घेतल्याने शिल्लक राहिलेल्या जागातून प्रवेश मिळू शकतो. याशिवाय उर्वरीत 60 विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडून कोटा वाढवून मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी केंद्र सरकारला पत्र देणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

VIDEO: धक्कादायक! समोशात बटाट्याऐवजी आढळला कापडाचा तुकडा

First published: May 10, 2019, 3:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading