शेतीत आला ड्रोन, काम पाहून तुम्ही व्हाल थक्क!

शेतीत आला ड्रोन, काम पाहून तुम्ही व्हाल थक्क!

या ड्रोनची एका वेळी 10 लिटर फवारणीची क्षमता असून सर्वत्र एकसारखी फवारणी होते.

  • Share this:

जुन्नर, 10 जानेवारी : अनेक ठिकाणी ड्रोनचा वापर केला जातो. असाच एक ड्रोन सध्या जुन्नर तालुक्यातल्या शिरोली बुद्रुक परिसरात पाहायाला मिळतोय.

या ड्रोनचं शेतामध्ये काय काम?  तर या ड्रोनच्या मदतीनं शेतावर फवारणी केली जाणार आहे. जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक परिसरात ड्रोनद्वारे शेतावर सुरू असलेल्या फवारणीची; एकच चर्चा रंगतेय. ही हायटेक फवारणी पाहण्यासाठी शेतकरीही गर्दी करत आहे. नाशिक इथल्या एका कंपनीनं हा प्रयोग हाती घेतला.

या ड्रोनची एका वेळी 10 लिटर फवारणीची क्षमता असून सर्वत्र एकसारखी फवारणी होते. या  फवारणीसाठी शेतकऱ्यांना एकरी 800 रुपये मोजावे लागताय. शेतकऱ्यांना मजुरांनाही इतकेच पैसे द्यावे लागतात. मात्र, ड्रोनच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांची वेळेचीही बचत होणार आहे. तसंच, मजुरांमुळे शेतातल्या नाजूक पीकांची होणारी नासधूसही ड्रोनच्या फवारणीमुळे थांबण्यास  मदत होइल.

अगदी काही मिनिटांत शेतावर ड्रोनने सहज फवारणी केली जाऊ शकते. तसंच, सूक्ष्म पद्धतीनं पीकावर सर्वत्र फवारणी होत असल्याने याचा चांगला फायदा होत असल्याचंही शेतकरी सांगत आहे. त्यामुळे भविष्यात तुम्हाला शेतात ड्रोन फिरताना दिसला तर नवल वाटायला नको.

तुम्ही कधी मोंगा-पोपटी पार्टी केलीय का? जाणून घ्या खास वैशिष्ट्य

कोकणात कडाक्याची थंडी पडायला लागली की इथल्या तरुणाईला वेध लागतात ते शेतातल्या मोंगा पार्टीचे. अनेकजण याला पोपटी म्हणून देखील संबोधतात. पोपटी किंवा मोंगा हा प्रकार गेल्या 4 /5 वर्षात जास्तच लोकप्रिय झालाय.

काय आहे मोंगा/ पोपटीचा नेमका प्रकार?

एक मोठं मडकं घेतलं जातं त्यात अंडी, कांदे,लसूण, बटाटे, चिकन, मासे जे काही हवं ते (खाण्याच्या सर्व फळभाज्या) खचून भरलं जाते. त्यापूर्वी मडक्यात जंगली पाला टाकला जातो ज्याला भांभुर्डीचा पाला म्हटलं जातं (मडक्याला आगीचा शेक लागून ते लगेच फुटू नये म्हणून हा पाला आतल्या बाजूंने लावला जातो. या पाल्याचा स्वाद पावट्याच्या शेंगा आणि चिकनमध्ये मिसळल्यामुळे ते आणखी स्वादिष्ट बनत असं म्हणतात) तयार केलेलं सर्व मिश्रण मडक्याच्या आत व्यवस्थित लावलं जातं आणि मोठ्या प्रमाणात ओवा टाकून मडक्याचे तोंड बंद करून ते उलट करून एका खड्यात ठेवलं जातं.

मडक्याच्या चारही बाजूने आग लावून, निखाऱ्याच्या वाफेवर मडक्यातल सर्व चिकन आणि इतर भाज्या व्यवस्थित शिजवल्या जातात. जवळपास अर्ध्या तासात हे सगळं शिजलं की, एका मोठ्या केळीच्या पानावर मडकं पालथी घालून त्यावर ताव मारला जातो. वाफेवर शिजल्यामुळे यातल्या भाज्या चिकन आणि पावट्याच्या शेंगा अत्यंत चवदार बनतात आणि म्हणूनच कोकणात आलात की रायगडपासून ते तळ कोकणापर्यंत तुम्हाला पोपटी किंवा मोंगा पार्टीचा आस्वाद घेता येऊ शकतो. विशेष करून थंडीच्या दिवसात अश्या पार्ट्या मोठ्या प्रमाणात तरुण मंडळी करताना दिसतात.

पोपटी ही हल्ली जरी पार्टी/मेजवानी म्हणून केली जात असली, तरी पूर्वी शेताची राखण करण्यासाठी जमलेले शेतकरी थंडीपासुन वाचण्यासाठी आणि जागे राहण्यासाठी विरंगुळा म्हणून हे प्रकार करत असे. शेतात ज्या भाज्या, शेंगा मिळतात, रानटी उगवलेला भांबुर्डीचा पाला आणि घरून फक्त मीठ-मसाला आणून हे शेतकरी पोपटी करतात.

ही पिढ्यानं पिढ्या चाललेली कोकणी परंपरा कुटुंब, पाहूणे, मित्र अशा सर्वांना बोलावून अजुनही साजरी केली जाते. पोपटी मडक्यात भरून ती शिजेपर्यंत अर्धा-पाऊण तास  वेळ  लागतो. यादरम्यान धमाल गप्पा रंगतात, जुन्या आठवणी, गाण्यांच्या घरगुती मैफिली यांची रंगत औरच असते.

जे मांसाहार करत नाहीत असे लोकं शाकाहारी पोपटी देखील त्याच पद्धतीने बनवतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: junner
First Published: Jan 10, 2020 09:30 AM IST

ताज्या बातम्या