मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Baramati News : खोकला आला म्हणून औषधाची बाटली समजून प्यायले विष, पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैर्वी मृत्यू

Baramati News : खोकला आला म्हणून औषधाची बाटली समजून प्यायले विष, पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैर्वी मृत्यू


ज्या बाटलीतून ते औषध प्यायले होते त्यामध्ये फवारणीचे विष असल्याचे लक्षात आल्यावर पोलीस स्टेशनमध्ये एकच खळबळ उडाली.

ज्या बाटलीतून ते औषध प्यायले होते त्यामध्ये फवारणीचे विष असल्याचे लक्षात आल्यावर पोलीस स्टेशनमध्ये एकच खळबळ उडाली.

ज्या बाटलीतून ते औषध प्यायले होते त्यामध्ये फवारणीचे विष असल्याचे लक्षात आल्यावर पोलीस स्टेशनमध्ये एकच खळबळ उडाली.

बारामती, 30 मार्च :  बारामती (baramti) तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने (Baramati police station) खोकल्याचे औषध (Cough medicine)समजून विषारी औषध प्राशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत उपचारादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोपट विष्णू दराडे असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बारामती तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पोपट दराडे रूजू होते. दराडे यांना सोमवारी रात्री खोकल्याचा त्रास होत होता. खोकल्याचे औषध समजून दराडे यांनी शेतात फवारणी करण्यासाठी आणलेले टुफोर्टी हे विषारी औषध प्राशन केले.  काही वेळांनी त्यांना अचानक त्रास जाणवू लागला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना आपल्याला त्रास होत असल्याचे सांगितले आणि या बाटलीतील औषध प्यायले, अशी माहिती दिली.

मोठी बातमी, सम-विषम वक्तव्य प्रकरणी इंदोरीकर महाराजांची निर्दोष मुक्तता

ज्या बाटलीतून ते औषध प्यायले होते त्यामध्ये फवारणीचे विष असल्याचे लक्षात आल्यावर पोलीस स्टेशनमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु, दराडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दराडे यांच्या अकास्मीत निधनामुळे  हळहळ व्यक्त होत आहे.

Indian Idol 12 - मराठमोळ्या नचिकेत लेलेच्या एलिमिनेशवर वाद; पक्षपातीपणाचा आरोप

पोलीस कर्मचारी पोपट दराडे यांचे मुळगाव इंदापूर तालुक्यातील अकोले हे असून त्यांचा स्वभाव मनमिळावू आणि अत्यंत चांगल्या स्वभावाचा होता. सर्वांना विश्वासात घेऊन ते काम करीत असत. दराडे यांना दोन मुले पत्नी असून त्यांनी पोलीस सेवेत 24 वर्ष आपली सेवा बजावली होती.

First published:

Tags: बारामती