Home /News /maharashtra /

मोठी बातमी! रायगडमध्ये 879 कोटींचे 293 किलो अमली पदार्थ जप्त; आंतरराष्ट्रीय कनेक्शन आलं समोर

मोठी बातमी! रायगडमध्ये 879 कोटींचे 293 किलो अमली पदार्थ जप्त; आंतरराष्ट्रीय कनेक्शन आलं समोर

Drug Smuggling News Raigad: रायगड जिल्ह्यातील उरण येथील जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (JNPT) बंदरात महसूल गुप्तचर संचलनालयाने (DRI) मोठी कारवाई केली आहे.

    रायगड, 04 जुलै: रायगड (Raigad) जिल्ह्यातील उरण येथील जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (JNPT) बंदरात महसूल गुप्तचर संचलनालयाने (DRI) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत DRI च्या अधिकाऱ्यांनी तब्बल 879 कोटी रुपये किमतीचे तब्बल 293 किलो वजनाचे अमली पदार्थ जप्त केले आहे. ही देशातील अलीकडच्या काळातील सर्वात मोठी कारवाई असल्याचं म्हटलं जात आहे. अमली पदार्थांचा एवढा साठा अफगाणिस्तान इराणमार्गे भारतात आणला गेला आहे. याप्रकरणी DRI च्या अधिकाऱ्या संबंधित आरोपींनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू केली आहे. संबंधित आरोपींनी यापूर्वीही या मार्गानं मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. अफगाणिस्तानातून इराणमार्गे भारतात आणलेले हे अमली पदार्थ रायगडमधून पंजाबला नेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी DRI च्या अधिकाऱ्यांनी मुख्य आयातदाराला अटक केली असून अमली पदार्थाच्या तस्करीबाबत मोठं जाळं समोर येण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे. हेही वाचा- Mumbai Drugs Smuggling : NCB ची मोठी कारवाई, 50 लाखांचे ड्रग्ज जप्त, नायजेरीयन नागरिकासह तिघांना अटक आरोपींनी या हिरॉइनची तस्करी करत असताना, कागदोपत्री तुरटी आणि सुगंधी पावडरची वाहतूक करत असल्याचं दाखवलं होतं. पण महसूल गुप्तचर संचलनालयाच्या अधिकाऱ्यांचा संशय बळावल्यानं त्यांनी संबंधित मालाची पाहाणी केली. त्यानंतर 293 किलोग्रॅम वजनाचं अमली पदार्थाचं घबाड पोलिसांच्या हाती लागलं आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थाची बाजारातील किंमत तब्बल 879 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती DRI च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Drugs, Raigad

    पुढील बातम्या