डॉ.आनंद तेलतुंबडेंच्या जीवाला धोका, प्रकाश आंबेडकरांनी केला दावा

डॉ.आनंद तेलतुंबडेंच्या जीवाला धोका, प्रकाश आंबेडकरांनी केला दावा

माझा आवाज दाबण्यासाठीच सुडबुद्धीने डॉ.तेलतुंबडे यांच्याविरोधात कारवाई केली जात असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

  • Share this:

नवी दिल्ली,28 फेब्रुवारी: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे नातेवाईक आणि डाव्या आघाडीचे विचारवंत डॉ.आनंद तेलतुंबडे यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. माझा आवाज दाबण्यासाठीच सुडबुद्धीने डॉ.तेलतुंबडे यांच्याविरोधात कारवाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. नवीन महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक आरोप केले. 

पुण्यातील एल्गार परिषदेशी दूरदूरपर्यंत संबंध नसलेल्या नऊ जणांना नक्षलवादी म्हणत बेकायदा कृत्यरोधी कायद्यान्वे यूएपीए जाणीवपूर्वक लक्ष केले जात आहे. डॉ.तेलतुंबडे यांनाही अशाच प्रकारचे फसवण्याचे प्रयत्न केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न-आंबेडकर

राज्य सरकार मला अडकवू शकत नसल्याने माझा आवाज दाबण्यासाठी डॉ.तेलतुंबडेंचे नाव जोडले जात असल्याचाही आरोप आंबेडकरांनी केला. सध्या राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थक सरकार विरोधात आवाज बुलंद करणाऱ्यांमध्ये आघाडीवर आहेत. पण या प्रकरणात मला अडकवणे शक्य नसल्यानेच डॉ.तेलतुंबडे यांना फसवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावाही त्यांनी केला. डॉ.तेलतुंबडे यांचे संपूर्ण जीवन सार्वजनक क्षेत्रात गेले आहे. गेल्या सरकारला तेव्हा ते नक्षलवादी दिसले नाही. आता कुठल्याही प्रकारचा तपास केल्याशिवायच त्यांना अटक करण्याची भाषा बोलली जात आहे, असं आंबेडकर म्हणाले.

हे जरूर वाचा: 'सामना' रंगण्याआधी अमृता फडणवीस यांचं ट्वीट, रश्मी ठाकरेंचं केलं अभिनंदन

अनेक जणं रडारवर?

आनंद तेलतुंबडे यांच्यासह आणखी सहा जणांनाही याप्रकरणात गोवल्या जात असल्याचा दावा आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलतांना केला. मुंबई उच्च न्यायालयाने 14 फेब्रुवारीला एल्गार परिषदेसंबंधीच्या सुनावणी दरम्यान डॉ.तेलतुंबडेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी न्यायालयाने त्यांना चार आठवड्यांची मुभा दिली आहे. यूएपीए अंतर्गत जे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमक्ष येईल, त्याच्या कागदपत्राच्या प्रामाणित मूल्यांची तपासणी करण्याची विनंतीही आंबेडकरांनी न्यायालयाकडे केली आहे. भीमा कोरगाव प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याच्या मागणीबद्दल विचारले असताना फडणवीसांचे नाव ने घेता आंबेडकर यांनी तर एल्गार परिषदेचा खटला पूर्णता: खोटा असून हे प्रकरण निकाली लागलं की संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू असा इशारा प्रकाश आबेडकर यांनी दिला आहे.

हे जरूर वाचा: जन्मदात्या आईनेच पोटच्या चिमुरड्याला बुडवलं पाण्याच्या टाकीत , नंतर रचलं असं कुभांड!

First published: March 1, 2020, 6:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading