मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /वयाच्या अवघ्या 35 वर्षी डॉक्टराचं कोरोनामुळे निधन, चंद्रपूर हळहळला

वयाच्या अवघ्या 35 वर्षी डॉक्टराचं कोरोनामुळे निधन, चंद्रपूर हळहळला

डॉ. चांदेकर हे चंद्रपूर मेडिकल कॉलेजमध्ये (chandrapur medical college) औषधी विभागात असोसिएट प्रोफेसर या पदावर कार्यरत होते.

डॉ. चांदेकर हे चंद्रपूर मेडिकल कॉलेजमध्ये (chandrapur medical college) औषधी विभागात असोसिएट प्रोफेसर या पदावर कार्यरत होते.

डॉ. चांदेकर हे चंद्रपूर मेडिकल कॉलेजमध्ये (chandrapur medical college) औषधी विभागात असोसिएट प्रोफेसर या पदावर कार्यरत होते.

हैदर शेख, प्रतिनिधी

चंद्रपूर, 01 मे : राज्याला (Maharashtra Corona cases) कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस आणखी घट्ट होत चालली आहे. मृतांची संख्या ही थांबण्याचे नाव घेत नाहीये. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील मेडिकल कॉलेजमधील (chandrapur medical college)एका 35 वर्षीय डॉक्टरांचा कोरोनामुळे  (Corona) मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे

डॉ. प्रशांत चांदेकर (Dr. Prashant Chandekar ) असं मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.  डॉ. चांदेकर हे  चंद्रपूर मेडिकल कॉलेजमध्ये (chandrapur medical college) औषधी विभागात असोसिएट प्रोफेसर या पदावर कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.  त्यांना कोरोनाची लागण झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान, ऑक्सिजनची पातळी खालावल्याने त्यांना नागपूरला नेत असताना वरोरा शहराजवळ वाटेतच झाला मृत्यू झाला.

तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात, राज्यात 'या' ठिकाणी आजपासून मिळणार लस

वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी कोरोनामुळे डॉ. प्रशांत चांदेकर यांचं निधन झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात 11 मेपर्यंत रुग्णांची संख्या वाढण्याची भीती

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना वाढीची धक्कादायक अंदाजे आकडेवारी समोर येत आहे. 11 मेपर्यंत जिल्ह्यात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 40 हजारावर पोचण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. व्हेंटिलेटर बेडच्या अभावामुळे आणीबाणीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नवी अंदाजे आकडेवारी आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यापुढच्या काळात मोठ्या संख्येत विलगीकरण बेड्स उपलब्ध केले जाणार आहे. आयसीयू बेड्स आणि व्हेंटिलेटरची मागणी नोंदविली जाणार आहे. जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठा देखील नव्या आकडेवारी नुसार निश्चित केला जाणार आहे.  ग्रामीण भागातील तालुकास्तरीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड्स वाढविण्याबाबत युद्धपातळीवर तयारी सुरू आहे.

पालकांनो लक्ष द्या! मुलांना कोरोना झाल्यास काय करावं? केंद्राने दिला सल्ला

दरम्यान, गेल्या 24 तासात 1667 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 28 मृत्यू जणांचा मृ्त्यू झाला आहे. जिल्ह्यात 60312 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. तर 42823 जण  कोरोनामुक्त झाले आहे. तर 16584 अॅक्टिव्ह रुग्ण संख्या आहे. आतापर्यंत  905 जणांचा मृत्यू झाला आहे.

First published:
top videos