20 वर्षे वयोगटातील महिलांच्याही गर्भपिशवी काढल्या, समितीच्या आले निदर्शनास

20 वर्षे वयोगटातील महिलांच्याही गर्भपिशवी काढल्या, समितीच्या आले निदर्शनास

20 वर्षे वयोगटातील महिलांच्याही गर्भपिशवी काढल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे. अशा महिलांचे गर्भाशय का काढले, या बाबत जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत संबंधीत हॉस्पिटलकडून खुलासा मागवण्यात आल्याची माहिती समितीच्या अध्यक्षा उपसभापती आणि शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बीड येथे दिली

  • Share this:

बीड, 17 जुलै- 20 वर्षे वयोगटातील महिलांच्याही गर्भपिशवी काढल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे. अशा महिलांचे गर्भाशय का काढले, या बाबत जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत संबंधीत हॉस्पिटलकडून खुलासा मागवण्यात आल्याची माहिती समितीच्या अध्यक्षा उपसभापती आणि शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बीड येथे दिली. गर्भाशय काढणे या शस्त्रक्रियेसंदर्भात पुरुषांचे प्रबोधन करावे लागेल. समितीचा अहवाल 10 ऑगस्टपर्यंत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वंजारवाडी (जि. बीड) गावात प्रत्यक्ष जाऊन महिलांशी संवाद साधला. यावेळी आमदार विद्या चव्हाण, सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ . प्रदीप व्यास, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या विभागप्रमुख डॉ. शिल्पा नाईक, आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले, मराठवाडा विभागाचे कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.आर. पवार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आदी उपस्थित होते.

ऊसतोड महिला कामगारांच्या दृष्टीने आरोग्यपूर्ण सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी उपाययोजना करण्यास प्राधान्य देण्याची शिफारस करू, यासाठी ऊसतोड हंगामावर जाण्यापूर्वी आरोग्य तपासणी आणि प्रत्यक्ष हंगामाच्या कालावधीत संबंधित ठिकाणी उपचार करण्यात येतील. महिलांना सुविधा तसेच कामगार आयुक्त कार्यालयामार्फत त्यांच्या नोंदणी करून शासनाच्या इतर योजनांचा लाभ देणे, ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत, मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे , साखर आयुक्तांनी यासाठी संबंधित साखर कारखान्यांमार्फत स्वच्छतागृहे, राहाण्याच्या सुरक्षित सुविधा उपलब्ध करणे, अशा विविध प्रश्नांबाबत समिती अहवाल देईल, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

VIDEO : रिक्षातून बाहेर खेचून पत्नीने पतीला भररस्त्यावर बेदम धुतले

First published: July 17, 2019, 9:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading