डॉ. हर्षवर्धन यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा, ऑक्सिजन पुरवठ्याबाबत काय ठरलं?

डॉ. हर्षवर्धन यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा, ऑक्सिजन पुरवठ्याबाबत काय ठरलं?

या संकटाचा सामना करण्यासाठी टेस्ट, ट्रॅक, ट्रिट, कोविड योग्य वर्तन आणि लसीकरण या पाच स्तंभांवर लक्ष केंद्रीत करण्याचा पुनरुच्चार केल्याचंही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 एप्रिल : राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात वाढत चाललेला तणाव कमी करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. डॉ. हर्ष वर्धन यांनी शनिवारी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून (Dr Harsh Vardhan spoke to Uddhav Thackeray) चर्चा केली. राज्यातील स्थिती जाणून घेत त्यांनी पुन्हा एकदा, राज्याला शक्य ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं. (oxygen supply)

(वाचा-केंद्र सरकारमधील हे 6 जण आपल्या काय कामाचे?, काँग्रेसचा भाजपवर निशाणा)

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी नुकतंच बोलून त्यांना आवश्यक असलेला वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरेसा आणि अखंडित पुरवठा करण्याचं आश्वासन पुन्हा एकदा दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर आवश्यक असलेले सर्व सहकार्य औषधी, उपचार पद्धती आणि इतर सोयीसुविधा पुरवण्याचं आस्वासन दिल्याचंही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं.

आणखी 1121 व्हेंटिलेटर

डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्रातील स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त 1121 व्हेंटिलेटरही दिले जात असल्याची माहितीही दिली. तसंच उद्धव ठाकरे यांच्याशी कोविडच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपचार आणि इतर बाबींवरही त्यांनी चर्चा केली. या संकटाचा सामना करण्यासाठी टेस्ट, ट्रॅक, ट्रिट, कोविड योग्य वर्तन आणि लसीकरण या पाच स्तंभांवर लक्ष केंद्रीत करण्याचा पुनरुच्चार केल्याचंही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे.

(वाचा - Remdesivir घेताना तपासून घ्या, रेमडेसिवीरच्या नावाखाली होतेय पॅरासिटामॉल विक्री)

राज्यात कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनची मागणी आणि उपलब्धता किंवा पुरवठा यातील फरकामुळं राज्यानं केंद्राकडं ऑक्सिजनची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात पंतप्रधानांना फोनही केला होता. यावरून अनेक आरोप प्रत्यारोप झाले. त्यानंतर आता खुद्द केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनीच उद्धव यांच्याशी याबाबत चर्चा केल्याची माहिती दिली आहे.

Published by: News18 Desk
First published: April 17, 2021, 6:07 PM IST

ताज्या बातम्या