आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा गजब कारभार, 'कोणीही या आणि डिग्री मिळवा' !

आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा गजब कारभार, 'कोणीही या आणि डिग्री मिळवा' !

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा परिक्षा विभाग म्हणजे अनागोंदी कारभार अशी ओळखच निर्माण झालीय.

  • Share this:

17 जुलै : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा परिक्षा विभाग म्हणजे अनागोंदी कारभार अशी ओळखच निर्माण झालीय. आता तर या विभागाने चक्क नापास आणि परिक्षेला गैरहजर विद्यार्थ्यांनाच डिग्री प्रमाणपत्र देऊन ढिसाळ कारभाराचा कळस केलाय.

'कुणीही या आणि डिग्री मिळवा...असं आंदोलनकर्त्यांनी उगाच म्हटलं नाहीये. विद्यापिठातील बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन या परिक्षेतील नापास आणि गैरहजर विद्यार्थ्यांनाच विद्यापिठानं चक्क पदवी बहाल केलीये.

परीक्षा विभागाच्या या गोंधळाला कारणीभुत आहेत ते विद्यापिठाचे परिक्षा नियंत्रक. बीसीएच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क भरताना डिग्री प्रमाण पत्राचेही शुल्क घेतले गेले. त्यामुळे शुल्क भरलेल्या विद्यार्थीचे डिग्री प्रमाणपत्र छापले गेले. पण हा दोष परिक्षा नियंत्रकांनी कंम्युटरच्या माथी मारला.

VIDEO : खड्ड्यांविरोधात मंत्रालयाबाहेरचा रस्ता खोदूण मनसेचं आंदोलन

आता याला काय म्हणावं की, परिक्षा कंम्युटर अप्लिकेशनची आणि तांत्रिक घोळही घातला कम्युटरनं. विद्यापिठानं म्हणे यासाठीच चौकशी समिती नियुक्त केलीये.

या प्रकरणात परिक्षा नियंत्रकासह एकुण सहा जणांना विद्यापिठानं कारणे दाखवा नोटीस दिलीय. दोषींवर कारवाईचे संकेतही दिलेत. या घटनेनं विद्यापिठाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणलाय.

हेही वाचा...

मनुस्मृतीचा अभ्यास करून आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली-संभाजी भिडे

आंबा खाल्याने पुत्रप्राप्ती होतेच हे कोर्टात सिद्ध करेन-संभाजी भिडे

लज्जास्पद, भारताच्या सुवर्णकन्येची 'गुगल'वर शोधली गेली ‘जात’

First published: July 17, 2018, 9:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading