नवी मुंबईत दुहेरी हत्याकांड! दिराने केला वहिनी-पुतण्याचा खून; रात्रभर राहिला मृतदेहांसोबत

नवी मुंबईत दुहेरी हत्याकांड! दिराने केला वहिनी-पुतण्याचा खून; रात्रभर राहिला मृतदेहांसोबत

अवजड वस्तू डोक्यात घालून दिराने वहिनी आणि पुतण्याची हत्या केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घरगुती वादातून ही हत्या झाली असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

  • Share this:

कामोठे(पनवेल), 10 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांमध्ये नवी मुंबईत गुन्ह्यांचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. आताही पनवेलच्या कामोठेमध्ये दुहेरी हत्याकांड समोर आलं आहे. दिराने वहिनी आणि पुतण्याची हत्या केल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण कामोठे परिसरात बऱ्यापैकी शांततेचं वातावरण असतं. त्यात खुनाचा असा प्रकार समोर आल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कामोठे सेक्टर 34 मधील एकदंत सोसायटीमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली आहे. अवजड वस्तू डोक्यात घालून दिराने वहिनी आणि पुतण्याची हत्या केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घरगुती वादातून ही हत्या झाली असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

वहिनी जयश्री चव्हाण आणि 2 वर्षाचा पुतण्या अविनाश चव्हाण अशी मृतांची नावं आहेत. तर सुरेश चव्हाण असं आरोपीचं नाव आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी दिर हा त्यांच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला होता. तो कोणतीच प्रतिक्रिया देत नाही आहे. दरम्यान, हत्या झाल्याचं शेजारील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

कामोठे पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी सुरेश चव्हाण याला ताब्यात घेतलं आहे. तर संपूर्ण तपासानंतर त्याच्यावर दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून वहिनी आणि पुतण्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

इतर बातम्या - भाजप-सेनेच्या मेगाभरतीमुळे युतीत मोठा ट्विस्ट, असा असेल नवा फॉर्म्युला

मुंबई हादरली! मित्राच्या जुळ्या मुलीला 7व्या मजल्यावरून फेकलं, डायरीत लिहलं होतं...

मुंबईच्या कोलाबा परिसरात एक झोप उडवणारी घडना घडली आहे. एका व्यक्तीने मित्राच्या तीन वर्षाच्या मुलीला सातव्या मजल्यावरून खाली फेकलं. जेव्हा आरोपी दुसर्‍या मुलीलाही फेकण्यासाठी जात होता तेव्हा लोक घरात घुसले आणि त्याला पकडलं. या सगळ्या गंभीर प्रकारामुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी व्यक्तीला अटक केली आहे. तर पोलिसांना आरोपीच्या घरातून एक डायरी मिळाली असून त्यातून हत्येचं कारण समोर आलं आहे.

इतर बातम्या - हा VIDEO पाहून हृदयाचा ठोका चुकेल, साखरपुडा मोडल्याने तरुणाची इमारतीवरून उडी!

आरोपी आफ्रिकेमध्ये करत होता काम...

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल चुकानी हा शिक्षित आहे. तो आफ्रिकन देश मोरोक्कोमध्ये बर्‍याच वर्षांपासून काम करत होता. अनिलची पत्नी मुंबईत राहायची. अनिलला मुलं नाहीत. तो गेल्या महिन्यापासून भारतात राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिलला मोरोक्कोमधील एका महिलेने सांगितलं होतं की, जर त्याला बाप बनायचं असेल तर त्याने दोन मुलींचा बळी द्यावा लागेल आणि ती दोन्ही जुळ्या मुली असल्या पाहिजेत. मुलांचा बळी दिल्यानंतर तुला मुलंही होतील आणि तुझ्याकडे पुष्कळ पैसेही असेल.

इतर बातम्या - धक्कादायक! KISS करण्यासाठी विद्यार्थिनीने दिला नकार, मित्राने जीव घेऊन...

बळीसाठी निवडलं मित्राच्या मुलांना...

आरोपी अनिलने मुंबईत आल्यानंतर आधी जुळ्या मुलींचा शोध सुरू केला. नंतर त्याच्या लक्षात आलं की त्याच्या बालपणीच्या मित्राला दोन जुळ्या मुली आहेत. सप्टेंबरमध्ये आरोपी अनिल मित्राच्या घरी गेला. त्यांच्यासोबत जेवनाता बेत आखला. घरी असताना अनिलने एका मुलीला बेडरूममध्ये ठेवलं आणि दुसर्‍या मुलीला थेट सातव्या मजल्यावरून खाली फेकलं. इमारतीतल्या लोकांच्या हे लक्षात येताच त्यांनी अनिलला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.

VIDEO: काँग्रेस-राष्ट्रवादीला भविष्य नाही; मत वाया घालवू नका, पंकजा मुंडे आक्रमक

Published by: Renuka Dhaybar
First published: September 10, 2019, 12:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading