Home /News /maharashtra /

उपमुख्यमंत्री काय तुमची वसुली करायला झालो नाही, अजितदादांनी कार्यकर्त्यांना बजावले, VIDEO

उपमुख्यमंत्री काय तुमची वसुली करायला झालो नाही, अजितदादांनी कार्यकर्त्यांना बजावले, VIDEO

'वेडवाकडी काम करू नका, वेडीवाकडी धंदे करू नका, वाईट सवयी असलेल्या लोकांच्या नादी लागू नका, हे मला स्पष्ट सांगायचंय'

बारामती, 25 जुलै : परखड बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) हे महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. आज सुद्धा बारामतीमध्ये (baramati) कार्यकर्त्यांशी बोलत असताना अजितदादांनी चांगलीच कानउघडणी केली. 'चुकीचं कुणी वागायचं नाही, कुठे बेकायदेशीर अवैध व्यवसाय, कुठे सावकारीचा धंदा, कुठे शेकड्याने पैसाचा धंदा असेल ना त्यांना मी सोडणार, कितीही मोठ्या बापाचा असला तरी अजिबात सोडणार नाही त्याला मोका लावला जाईल' असा सज्जड दमच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. आज बऱ्याच दिवसांनी अजित पवार बारामतीत आले होते. यावेळी एका कार्यक्रमात बोलत असताना अजितदादांनी कार्यकर्त्यांना चांगल्या सवयी लावण्याचा सल्ला दिला जर कुणी वाईट मार्गाला लागलं तर सोडणार नाही, अशा सज्जड दम सुद्धा अजितदादांनी कार्यकर्त्यांना दिला. आपली मुलं इथं लहानाची मोठी होत असतात, त्यामुळे त्यांच्यावर चांगले संस्कार पडले पाहिजे. हे सगळं करत असताना चुकीचं कुणी वागलं ना, कुठे अवैध धंदा, कुठे सावकारीचा धंदा, शेकड्याने पैशाचा व्यवहार असेल, त्यांना मात्र सोडणार नाही. कितीही मोठ्या बापाचा असाल तर त्याला मोका लावीन, त्यांना वाटलं तर तडीपार करीन, त्यांच्या बगलबच्चांना सुद्धा हे सांगून ठेवा, असा सज्जड दमच अजितदादांनी कार्यकर्त्यांना भरला. भारतीय हवाई दलात दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी; 'या' जागांसाठी करा अर्ज तसंच, 'वेडवाकडी काम करू नका, वेडीवाकडी धंदे करू नका, वाईट सवयी असलेल्या लोकांच्या नादी लागू नका, हे मला स्पष्ट सांगायचंय. नाहीतर दादा, यांनी माझी पैसे बुडवले, असं सांगत येता. मी काय उपमुख्यमंत्री वसुली करण्यासाठी बनलोय का? असा सवालच विचारत अजितदादांनी कार्यकर्त्यांना  चांगलेच सुनावले.

Tokyo Olympics : मानिका बत्राची कमाल, मोठ्या पिछाडीनंतर मिळवला विजय

तसंच, काहीही कामं घेऊन येतात. दादा, याचं काम केलं पण याने पैसे दिलेच नाही. त्याने पैसे दिले नाही. अरं, मग पैसे दिले कशाला? एवढं तरी कळतं की कोण पैसे देऊ शकतो, कोण चुणा लावू शकतो, कोण टोपी घालू शकतो.व्यवहार करणारा माणूस लगेच लक्षात येतो. नवी गावं आली आहे, त्यांचे रस्ते मोठे करायचे आहे, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असंही अजितदादा म्हणाले. अजितदादांनी केलं चहा टपरीचे उद्घाटन, घेतला चहाचा आस्वाद दरम्यान, बारामतीत आयोजित महाआरोग्य शिबिराचा  कार्यक्रम आटोपून जात आसताना, एका कार्यकर्त्याने अजितदादांना आग्रह धरला, की दादा मी फिरत्या वाहनावर टी स्टॉल चालू केले आहे. याचे उद्घाटन आपण करावे ही इच्छा आहे. मग काय, अजित पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता, त्या कार्यकर्त्याच्या चहाच्या टपरीवर गेले व त्याचे उद्घाटन केले शिवाय दादांनी तुझ्या चहाची क्वालिटी आहे का? असे विचारून स्वतः चहा मागून त्याचा आस्वाद घेतला.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या