Home /News /maharashtra /

पंकजा मुंडेंना बीडमधूनच घरचा अहेर, 'एका नेत्याच्या विचाराने निर्णय घेऊ नका!'

पंकजा मुंडेंना बीडमधूनच घरचा अहेर, 'एका नेत्याच्या विचाराने निर्णय घेऊ नका!'

पंकजा मुंडे लवादाच्या प्रतिनिधी असताना तीन वर्षांचा करार पाच वर्षांवर गेला. त्यामुळे उसतोड मजुरांना त्रास सहन करावा लागत आहे.

बीड, 07 सप्टेंबर :  'सरकारने एका नेत्याना विचारात घेऊन ऊसतोड मंजुरांसंदर्भात लवदाचा निर्णय घेवू नये सर्वांना विश्वासात घ्या' अशी मागणी करत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना जिल्ह्यातूनच घरचा आहेर देण्यात आला आहे. पंकजा मुंडे लवादाच्या प्रतिनिधी असताना तीन वर्षांचा करार पाच वर्षांवर गेला. त्यामुळे उसतोड मजुरांना त्रास सहन करावा लागत आहे. राज्यातील 13 नोंदणीकृत संघटनांना विश्वासात घेऊनच ऊसतोडणी संदर्भात सरकार ने सामोपचाराने निर्णय घ्यावा, असा इशारा  बीड जिल्हा ऊसतोड मजूर संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. ऊसतोड कामगाराला हार्वेस्टर प्रमाणे मजुरी मिळावी समान काम समान वेतन मिळावं, 150 टक्के मजुरीत वाढ द्यावी तसंच 13 नोंदणीकृत संघटनेच्या प्रतिनिधीला विश्वासात घेऊन करार करा, अशी मागणी करत आज ऊसतोडणी कामगार, वाहतूक कामगार, मुकादम संघर्ष समितीच्या वतीने बीड जिल्ह्यातील पत्रकार परिषद घेऊन ऊसतोड कोयता बंद संपासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. यावेळी प्रामुख्याने तीन मागण्या करण्यात आल्या. पाच वर्षांचा करार हा 3 वर्षाचा करावा, 150% ऊसतोड मजुरी वाढ द्या, मुकादम कमिशन, एका नेत्याशी बोलून करार करू नये. सर्व संघटनेच्या प्रतिनिधीला बोलवा. सरकार सोबत चर्चा करून सामंजस्याने प्रश्न सोडवू मात्र, सर्वांच्या मतांचा विचार करावा, ऊसतोड मजुरांच्या मागण्या मान्य झाल्या शिवाय संघर्ष थांबणार नाही, असं या पत्रकार परिषदेत सांगितले. संघर्ष समितीच्या सदस्य माजी आमदार जनार्धन तात्या तुपे, प्रा. सुशीलाताई मोराळे, सीपीआयचे मोहन जाधव ,वंचित बहुनज आघाडीचे शिवराज बांगर, आम आदमीचे अशोक येडे यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे, आज सकाळीच पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा करणार अशी माहिती दिली होती.
Published by:sachin Salve
First published:

Tags: BJP, NCP

पुढील बातम्या