• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • सुरूवात विसरता कामा नये! कपिल पाटील यांनी सरपंचाच्या खुर्चीला केलं वंदन

सुरूवात विसरता कामा नये! कपिल पाटील यांनी सरपंचाच्या खुर्चीला केलं वंदन

आपल्या कुटुंबीयांसह थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले व तेथील ग्रामपंचायत सरपंच खुर्चीस वंदन केले, त्यावेळी त्यांना गहिवरून आले होते.

आपल्या कुटुंबीयांसह थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले व तेथील ग्रामपंचायत सरपंच खुर्चीस वंदन केले, त्यावेळी त्यांना गहिवरून आले होते.

आपल्या कुटुंबीयांसह थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले व तेथील ग्रामपंचायत सरपंच खुर्चीस वंदन केले, त्यावेळी त्यांना गहिवरून आले होते.

  • Share this:
भिवंडी, 20 ऑगस्ट : मोदी सरकारमध्ये (modi government) नव्याने मंत्रिपद मिळालेल्या राज्य मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा ( jan ashirwad yatra) सुरू आहे. आगरी समाजातून पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री होण्याचा मान कपिल पाटील (kapil patil) यांना मिळाला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी त्यांचं जल्लोषात स्वागत होत आहे. पण, मंत्रिपद मिळाल्यानंतरही कपिल पाटील यांनी आपला साधेपणा कायम राखल्याचं पाहण्यास मिळालं आहे. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पाच दिवस सुरू असलेल्या जन आशीर्वाद यात्रेचा समारोप भिवंडी (bhiwandi) तालुक्यातील दिवे अंजुर या त्यांच्या मूळगावी झाला. त्यामुळे होमग्राऊंडमध्ये त्यांचं भव्य स्वागत झाल्यावर सर्वप्रथम त्यांनी ग्रामदेवतेचे दर्शन घेतलं. त्यानंतर आपल्या कुटुंबीयांसह थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले व तेथील ग्रामपंचायत सरपंच खुर्चीस वंदन केले, त्यावेळी त्यांना गहिवरून आले होते. 60 वर्षांच्या आरोपीकडून गर्लफ्रेंडचा खून, पैसे दिले नाहीत म्हणून दाबला गळा कपिल पाटील यांनी 1988 मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात दिवे अंजुर ग्रामपंचायतीचे सरपंच पदापासून सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विविध पदे भूषवित थेट राज्यमंत्री पदाला गवसणी घातली आहे. Private part मध्ये टाकले राजमा आणि...; लैंगिक सुखासाठी भलताच प्रयोग महागात पंचायत सरपंच ते पंचायतराज राज्यमंत्री बनण्याचे स्वप्न सुद्धा मी कधी पाहिले नव्हते. परंतु गावाच्या ग्रामस्थांनी 1988 मध्ये व्यक्त केलेला विश्वास प्रत्येक वेळी सार्थ ठरविल्याने कुटुंबीयांच्या सहकार्याने व कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे प्रत्येक ठिकाणी केलेल्या कामाची पोच पावती मिळत गेली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संधी दिल्याने हे पद मला मिळाल्याची प्रतिक्रिया यावेळी कपिल पाटील दिली.
Published by:sachin Salve
First published: