मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गाढवाच्या दुधाला हजारोंचा भाव; मराठवाड्यात गाढविणीचं दूध विकलं जातंय 10 हजार रुपये लीटर

गाढवाच्या दुधाला हजारोंचा भाव; मराठवाड्यात गाढविणीचं दूध विकलं जातंय 10 हजार रुपये लीटर

गाढविणीचं दूध प्यायलं की माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं सांगून काही जणं हे दूध विकत आहेत.

गाढविणीचं दूध प्यायलं की माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं सांगून काही जणं हे दूध विकत आहेत.

गाढविणीचं दूध प्यायलं की माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं सांगून काही जणं हे दूध विकत आहेत.

हिंगोली, 9 डिसेंबर: कोरोनाला (Coronavirus) प्रतिबंध करायचा असेल तर रोगप्रतिकारशक्ती (Immune power)चांगली असायला हवी हे सत्य आता इतकं प्रस्थापित झालंय की जगभरातील लहान मूलही छातीठोकपणे हे सत्य सांगेल. कोरोनाच्या साथीला (Covid-19) ओसर पडला असला तरीही कोरोनाचे नवनवे व्हेरियंट सापडल्याच्या बातम्यांमुळे पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. जनमानसात कोरोना महामारीचं भय एखाद्या पौराणिक कथांतल्या राक्षसासारखं घट्ट बसलं आहे. त्यामुळे आजही प्रत्येक जण प्रतिकारशक्ती (Immunity) वर्धनासाठी प्रयत्नशील आहे. आजतक ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

हिंगोली शहरामध्ये एक नवीनच गोष्ट पसरली आहे आता ती कितपत खरी आहे कुणाला माहीत नाही पण ती पसरलेली मात्र आहे. गाढविणीचं दूध प्यायलं की माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं सांगून काही जणं हे दूध विकत आहेत. त्यामुळे कोरोनापासून (Donkey milk for coronavirus) बचाव होतो असा दावाही हे करत आहेत. याचा परिणाम असा झाला आहे की हिंगोलीत(Hingoli District Maharashtra) गाढविणीचं दूध (Donkey Milk) 10 हजार रुपये लिटरने विकलं जातंय.

मरना मना है! इथं कधी कुणीच मरत नाही; धक्कादायक आहे कारण

हिंगोलीच्या गल्लोगल्लीत जाऊन एक प्रचार सुरू झाला आहे. ‘गाढविणीचं चमत्कारिक दूध एक चमचा प्या आणि सगळ्या आजारांपासून मुक्ती मिळवा. हे दूध प्यायल्याने लहान मुलांना न्यूमोनिया, ताप, खोकला, कफ (Cough) हे आजार होत नाहीत. त्याचबरोबर या दूधामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि कोरोना होत नाही,’ असा दावा हे दूध विकणारे लोक करत आहेत.

चिकनगुनियावर गुणकारी ठरू शकतात हे घरगुती उपाय, या पद्धतींचा करा अवलंब

हे दूध विकणारे बालाजी मेसेवाड म्हणाले, ‘ मी गाढविणीचं ताजं दूध काढून ते विकतो. ते अनेक आजारांवर गुणकारी आहे. एक चमचा दूधाची किंमत 100 रुपये आणि 1 लिटर दुधाची किंमत 10 हजार रुपये आहे. हे दूध त्वचा आणि शरीराला उपयुक्त असून नवजात बालकाला जन्मल्यावर तीन दिवस न चुकता हे दूध पाजलं तर त्याला आयुष्यभर फायदा होतो.’

याबाबत डॉ. व्ही. एन. रोडगे यांनी आपलं मत सांगितलं. ते म्हणाले,‘ गाढविणीचं दूध 10 हजार रुपये लिटरने विकलं जात आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे दूध प्यायल्याने कोरोनासारखा आजार बरा होतो हे खोटं आहे. हे दूध पिण्याऐवजी डॉक्टर सांगतील ते औषध (Medicines) घेतलं पाहिजे. अशा अंधश्रद्धांवर लोकांनी विश्वास ठेवू नये आणि आपले पैसे वाया घालवू नयेत. आजार झाला तर थेट डॉक्टरांकडे जावं असं आवाहन मी हिंगोलीच्या जनतेला करेन.’

आरोग्यासाठी आवळा आहे बहुगुणी; मात्र अशा लोकांनी जपूनच खाणं ठरेल फायदेशीर

विज्ञान किंवा आधुनिक वैद्यकशास्राच्या कसोटीवर न तपासता काही औषधं सांगितली जातात पण त्यातील तथ्य तपासणं हे प्रत्येक सुजाण नागरिकाचं काम आहे. अंधश्रद्धा आणि अफवांमुळे नुकसान तर होतंचप्रसंगी जीवही जाऊ शकतो त्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास न ठेवणंच हिताचं ठरेल.

First published: