मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यावर सुनेचा गंभीर आरोप, अखेर पोलिसांचा गुन्हा दाखल

माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यावर सुनेचा गंभीर आरोप, अखेर पोलिसांचा गुन्हा दाखल

मधुकर पिचड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मधुकर पिचड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मधुकर पिचड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नाशिक, 04 डिसेंबर : माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड ( Madhukar Pichad ) घरातील वादामुळे अडचणीत सापडले आहे.  कौटुंबिक हिंसाचार (Domestic violence) प्रकरणी न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. मुलाची आत्महत्या आणि सुनेला जीवे मारण्याचा धमकी प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणामुळे नाशकात खळबळ उडाली आहे.

मधुकर पिचड यांचा मुलगा किरण याने 2016 मध्ये सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. या सुसाईट नोटमध्ये किरणने पत्नी राजश्रीचा उल्लेख करून  आयुष्य संपवले होते. तर दुसरीकडे किरण-राजश्री यांचा मुलगा जय यानेही आई राजश्रीवर आक्षेप घेतला होता. आता याच प्रकरणात, माझ्यावर अन्याय झालाय अशी तक्रार राजश्री यांनी कोर्टात केली होती.

लक्षणे दिसण्यापूर्वी कोरोना आहे की नाही सांगेल हे Smartwatch - नवीन संशोधन 

अखेर गुन्हा दाखल करून अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहे. पोलिसांनी मधुकर पिचड आणि कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  कलम 498, 306, 406, 324, 504, 506, 468, 471 अन्वये पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाईट Communication Skills मुळे येतंय अपयश? चिंता नको. या टिप्स करा फॉलो

तसंच, तत्कालीन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी चालढकल केल्याचा आरोपही राजश्री यांनी कोर्टात केला आहे. मधुकर पिचड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मधुकर पिचड आणि त्यांचा मुलगा वैभव पिचड यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादीमध्ये असताना प्रदेशाध्यक्षपद आणि मंत्रिपद सुद्धा उपभोगले होते. त्यानंतर आता कौटुंबिक वादामुळे पिचड यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

First published: