Home /News /maharashtra /

VIDEO : खंडणी प्रकरणातील महिला आरोपीचा धिंगाणा, पोलिसांचे तब्बल 6 तास वाया घालवले!

VIDEO : खंडणी प्रकरणातील महिला आरोपीचा धिंगाणा, पोलिसांचे तब्बल 6 तास वाया घालवले!

तब्बल सहा तासानंतर आरोपी महिलेला घराबाहेर काढण्यास पोलिसांना यश आलं.

डोंबिवली, 29 डिसेंबर : अनधिकृत बांधकामाच्या नावावर बिल्डरांकडून 8 कोटींची खंडणी उकळणाऱ्या विश्वनाथ आणि विद्या म्हात्रे यांना मंगळवारी विष्णूनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी विद्या म्हात्रे यांनी पोलिसांसमोर चांगलाच गोंधळ घातला. सुरुवातीला विद्या यांनी पोलिसांसाठी दरवाजाच उघडला नाही. पोलिसांना दरवाजे लॅच तोडून घरात जावे लागले. नंतर देवपूजा व होम हवन करीत तिने पोलिसांचा वेळ घालविला. अखेर सहा तासानंतर आरोपी महिलेला घराबाहेर काढण्यास पोलिसांना यश आलं. डोंबिवली पूर्वेतील नांदिवली परिसरात काही इमारतींचे काम सुरू आहे. या परिसरात काही वर्षांपासून बिल्डर वर्गीस म्हात्रे, विक्रांत सिंग आणि काही बिल्डर इमारतीचे बांधकाम करीत आहेत. या बिल्डरांना अनधिकृत बांधकामाच्या नावाखाली ब्लॅकमेल करून 8 कोटी रुपये उकळल्याचा आरोप विद्या म्हात्रे, विश्वनाथ म्हात्रे, एकनाथ म्हात्रे आणि सुनील म्हात्रे यांच्यावर करण्यात आला आणि बिल्डरांनी तक्रार  दिल्यानंतर चार जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी विश्वनाथ व विद्या म्हात्रे यांना मंगळवारी विष्णूनगर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, या गुन्ह्याचा निष्पक्ष तपास व्हावा यासाठी या गुन्ह्याचा तपास विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांच्याकडे देण्यात आला होता. अखेर मंगळवारी विष्णूनगर पोलीस ठाण्याचे पोलीस विद्या व विश्वनाथ यांना ताब्यात घेण्यासाठी दुपारी 11 च्या सुमारास गेले. सुरुवातीला विद्या यांनी पोलिसांना घरात घेतलेच नाही. पोलिसांना दरवाजे लॅच तोडून घरात जावे लागले. त्यानंतर देवपूजा व होमहवन मध्ये तिने पोलिसांचा वेळ घालविल्याची माहिती सूत्रांनी दिली. अखेर 6 तासानंतर त्यानंतर पोलिसांनी तिला घराबाहेर काढले. यावेळीही तिने पोलिसांना नाहक त्रास दिल्याचे दिसून आले. आता पोलिसांनी त्यांना अटक केली असून उद्या कोर्टात हजर करणार आहेत. तसंच यात अधिक तपास चालू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी सांगितले.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Crime news, Dombivali

पुढील बातम्या