Home /News /maharashtra /

31 डिसेंबरच्या रात्रीच त्याने साधला डाव, गोदामात चोरी; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

31 डिसेंबरच्या रात्रीच त्याने साधला डाव, गोदामात चोरी; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

घटना CCTVमध्ये कैद झाली असून याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली, 1 जानेवारी : 31 डिसेंबरच्या पहाटे सुनीलनगरमधील एका मसाल्याच्या गोदामात शटर उचकटून चोरट्याने तब्बल 15 हजार रुपयांची चिल्लर आणि 5 हजार रुपयांचे मसाले, पापड, लोणची चोरुन नेले आहे. चोर चोरी करीत असतानाची घटना CCTVमध्ये कैद झाली असून याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 31 डिसेंबरच्या पहाटे पावणे चारच्या सुमारास सुनीलनगर येथील मच्छिंद्र कुटे यांच्या गोडाऊनवर चोर मास्क लावून येतो. शांतपणे शटर उचकटून गोदामात शिरुन तब्बल 15 हजार रुपयाची चिल्लर तर चोरतोच आणि मसाले पापड आणि लोणची यांच्या पाकिटावर सुद्धा डल्ला मारतो. हा सर्व प्रकार गोदामातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी कुटे यांनी रामनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. एकीकडे काही दिवसांपासून कल्याण डोंबिवली परिसरात चेन स्नॅचिंग, दुकान फोडणे, मोबाईल चोरणे आणि इतर चोरीचे प्रमाण वाढलेले दिसते. दुसरीकडे पोलीसही या चोरांना पकडण्यात काही प्रमाणात यशस्वी होत आहेत. मात्र या सर्व घटनांना पूर्णपणे आळा घालण्यास पोलीस कोठेतरी कमी पडताना दिसत आहेत, अशी प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे. आता सदर चोरीच्या प्रकरणात चोरट्याला पोलीस पकडणार का हे पाहावं लागेल.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Crime news, Dombivali

पुढील बातम्या