Home /News /maharashtra /

हे फक्त डोंबिवलीतच होऊ शकतं! एसटी बस चालकाने भर रस्त्यातच...पाहा VIDEO

हे फक्त डोंबिवलीतच होऊ शकतं! एसटी बस चालकाने भर रस्त्यातच...पाहा VIDEO

कोणालाही काही न सांगता चालक अचानक निघून गेल्याने प्रवाश्यांचाही चांगलाच गोंधळ उडाला.

डोंबिवली, 19 ऑक्टोबर : कधी कोण कसे वागेल याचा नेम नसतो. डोंबिवलीतील एसटी बसने प्रवास करणाऱ्या काही नागरिकांना याचाच प्रत्यय आला आहे. कारण चालक भर रस्त्यात एसटी बस उभी करून गायब झाल्याचा प्रकार घडला. कोणालाही काही न सांगता चालक अचानक निघून गेल्याने प्रवाश्यांचाही चांगलाच गोंधळ उडाला. तब्बल 10 मिनिटे एसटी बस भर रस्त्यात उभी होती. त्यामुळे ट्रॅफिकला मोठा अडथळा निर्माण झाला होता. तर प्रवासीही ताटकळ राहिले. तसंच येणारे-जाणारे वाहनचालकही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेवून नेमकं काय होत आहे, हे पाहू लागले. या घटनेची माहिती मिळताच ट्रॅफिक पोलिसांनी चालकाला शोधून काढले. मात्र चालक कुठे गायब झाला होता, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, सरकारी सेवेतील कर्मचाऱ्याने केलेल्या या हलगर्जीपणाबद्दल प्रवाश्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हा कर्मचारी 10 मिनिटे नक्की कुठे गायब झाला होता आणि त्याच्यावर आता कारवाई होणार का, हे पाहावं लागेल.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Dombivali

पुढील बातम्या