Home /News /maharashtra /

डोंबिवलीकरांसाठी तो एक दिवस ठरला कोरोनाचा वाहक, आणखी एकाला झाली लागण

डोंबिवलीकरांसाठी तो एक दिवस ठरला कोरोनाचा वाहक, आणखी एकाला झाली लागण

आत्तापर्यंत पुण्यात 1366 जणांचा मृत्यू झाला. तर 38117 जणांना डिस्चार्ज करण्यात आलं.

आत्तापर्यंत पुण्यात 1366 जणांचा मृत्यू झाला. तर 38117 जणांना डिस्चार्ज करण्यात आलं.

डोंबिवलीमध्ये आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे.

डोंबिवली, 30 मार्च : राज्यात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. वारंवार सांगूनही लॉकडाऊन लोकांनी गांभीर्यानं घेतलेलं दिसत नसल्यानं पोलीस आणि प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. डोंबिवलीमध्ये आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. हा व्यक्ती डोंबिवली येथील म्हात्रेनगर येथे हळद आणि पश्चिमेला लग्न समारंभात उपस्थित होता अशी माहिती केडीएमसी कडून देण्यात आली आहे. याच प्रकरणात अजून किती जणांना कोरोनाची लागण झाली आहे यासंदर्भात शोध सुरू आहे.  महापौरच होम क्वारंटाइन या घटनेनंतर पोलिसांनी डोंबिवलीतील मढवी बंगला इथला परिसर पूर्णपणे लॉकडॉऊन केला आहे. कोरोनाच्या भीतीनं महापौर विनिता राणे यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन केलं आहे. या लग्न समारंभाला महापौर आपल्या पतीसह उपस्थित राहिल्या होत्या.तसेच काही लोकप्रतिनिधी सुद्धा उपस्थिती होते. डोंबिवलीतील हळद आणि लग्न प्रकरण नेमकं काय आहे? म्हात्रेनगर इथे 18 मार्च रोजी हळद आणि 19 मार्च रोजी जुनी डोंबिवली ग्राऊंड इथे विवाह समारंभ पार पडला. या समारंभात एक NRI तरुणही उपस्थित होता ज्याला कोरोनाची लागण झाली होती. या लग्न समारंभात महापौर आपल्या पतीसह अनेक नगरसेवकही उपस्थित होते. लग्नाला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका अधिक आहे. लग्नाला उपस्थित असलेल्यांपैकी नेमक्या किती जणांना लागण झाली आहे याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही मात्र पोलिसांकडून शोध सुरू आहे. डोंबिवलीत 3 गुन्हे दाखल या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. साथीचा रोग पसरवल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरोना पसरवल्याच्या आरोपाखाली डोंबिवलीत 3 गुन्हे दाखल केले आहे.यात कोरोना रुग्णावर गुन्हा दाखल केलाच तर लग्न असलेल्यांवर आणि जागामालकावर गुन्हा दाखल केला आहे. भादंवि कलम 188, 269, 270, 271 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.विशेष म्हणजे कोरोना परवलेल्या बद्दल गुन्हा दाखल करण्याची ठाणे जिल्ह्यातील ही पहिली घटना आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या