Home /News /maharashtra /

महावितरणने ग्राहकांना दिला 'शॉक', मनसे आणि शिवसेनेकडूनही आंदोलनाचा इशारा

महावितरणने ग्राहकांना दिला 'शॉक', मनसे आणि शिवसेनेकडूनही आंदोलनाचा इशारा

नागरिकांच्या तक्रारीनंतर आता मनसेसह शिवसेनेनंही आंदोलनाचा इशारा दिला आहे.

डोंबिवली, 21 जून : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महावितरणला आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले होते. मीटर रीडिंग करण्यासाठी व बिलाचे वितरण करण्यासाठी ग्राहकांच्या घरी जाऊ नये, अशा सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र या काळात मीटर रीडिंग न झाल्यामुळे ग्राहकांना सरासरी बिल आकारणी सुरू झाली आहे आणि 3 महिन्यांचे सरासरी बिल घेऊन सुद्धा आता महावितरणे ग्राहकांना हजारो रुपयांची बिले पाठवली आहेत. कोरोनाचे संकट, लॉक डाऊनमुळे अनेकांना कामे मिळत नाहीत. नोकऱ्या गेल्या आहेत आणि पगार सुद्धा कपात झाली आहे. त्यात आता नागरिकांना महावितरणने हजारो रुपयांची बिले पाठवून 'शॉक' दिला आहे. त्यामुळे ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी सवलत देण्याची मागणी नगरसेवक कुणाल पाटील यांनी ऊर्जा मंत्र्यांकडे केली. तर ग्राहकांकडून 3 महिन्यांचे सरासरी बिल घेऊन सुद्धा आता हजारो रुपयांची बिले पाठवली आहेत. यावर समाधानकारक तोडगा काढावा अन्यथा या विरोधात लोकांसोबत मनसेही मैदानात उतरेल असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला आहे. दुसरीकडे नागरिकांच्या बिलाची दुरुस्ती न केल्यास महावितरणवर धडक देणार असे शिवसेना नगरसेवक आणि माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सांगितले आहे. तसेच नागरिकांना अवास्तव आलेली विजबिले नागरिकांनी शाखेत जमा करावीत असे आवाहन सुद्धा केले आहे. ग्राहकांना आलेली बिले ही तांत्रिकदृष्या चुकीची आहेत, सुधारीत बिले द्या, अशी मागणी कल्याण-डोंबिवलीच्या जनतेकडून केली जात आहे. 'कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामगार आणि मजूर वर्ग आहे. त्यांना वीज बिल भरण्यासाठी सवलती देण्याची गरज आहे. याबाबत ऊर्जामंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे,' अशी माहिती अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिली. 'कोरोनाचे संकट, लॉकडाऊनमुळे अनेकांना कामे मिळत नाहीत. नोकऱ्या गेल्या आहेत आणि पगार सुद्धा कपात झाली आहे. महावितरणने ग्राहकांकडून 3 महिन्यांचे सरासरी बिल घेऊन सुद्धा आता हजारो रुपयांची बिले पाठवली आहेत. यावर समाधानकारक तोडगा काढावा अन्यथा या विरोधात लोकांसोबत मनसेही मैदानात उतरेल,' अशा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे. 'महावितरणने कोरोना संकट व काळाचे भान ठेवावे. महावितरणने नागरिकांना दिलेल्या 3 महिन्याच्या बिलाने ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. नागरिकांच्या बिलाची दुरुस्ती न केल्यास महावितरण वर शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर व महानगर प्रमुख विजय साळवी यांच्या नेतृत्वाखाली धडक देणार,' असं म्हणत शिवसेना नगरसेवक आणि माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे.
First published:

Tags: MNS, Shivsena

पुढील बातम्या