डोंबिवली, 25 जून: डोंबिवलीत (Dombivli) एक विचित्र अपघात घडला आहे. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून संपूर्ण प्रकार घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Accident caught in CCTV) झाला आहे. हा सीसीटीव्ही व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. कल्याण-डोंबिवली मनपाच्या घंटागाडीखाली चिरडून महिलेचा मृत्यू (Woman died in accident) झाला आहे.
डोंबिवली येथील खंबाल पाडा रोडवरुन आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घंटा गाडी जात होत्या. याच वेळी डोंबिवलीत राहणारे सुभाष खराटे (Subhash Kharate) आणि निलिमा खराटे (Nilima Kharate) हे दाम्पत्य रस्त्यावरून आपल्या दुचाकीने जात असताना अचानक त्यांच्या समोरील कार चालकाने ब्रेक दाबला. यामुळे दुचाकी चालवणारे सुभाष खराटे यांचा तोल जाऊन ते आपल्या पत्नीसह गाडीवरुन पडले.
डोंबिवलीत विचित्र अपघात; महिलेचा मृत्यू pic.twitter.com/oAjrRqmHON
— News18Lokmat (@News18lokmat) June 25, 2021
अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; स्वीय सहाय्यक संजीव पलांडे ईडीच्या ताब्यात, चौकशी सुरू
तोल गेल्याने गाडीवर मागे बसलेल्या निलिमा खराटे या थेट रस्त्यावर पडल्या तोच समोरुन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची घंटागाडी जात होती. त्या घंटा गाडीच्या मागच्या चाकाखाली निलिमा खराटे या चिरडल्या गेल्या. त्यांच्या डोक्यावरुन घंटा गाडीचे चाक गेले यात निलिमा खराटे यांचा जागीच मृत्यू झाला.
निलिमा खराटे यांचा मृत्यू झाला असून पती सुभाष खराटे हे अजूनही बेशुद्ध अवस्थेत आहेत. सुभाष खराटे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी घंटा गाडीच्या चालकाला ताब्यात घेतले असून सीसीटीव्ही पाहून पोलीस घंटागाडी ड्रायव्हरवर काय कारवाई करायची हे ठरवणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Cctv footage