मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

डोंबिवली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, गावकऱ्यांनी दगडफेक केली तरी आरोपी आणले पकडून!

डोंबिवली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, गावकऱ्यांनी दगडफेक केली तरी आरोपी आणले पकडून!

 झारखंड येथील गावच्या 20 गुंठे जमिनीवरून वाद सुरू होते. त्यामुळे चुलत भावाचा काटा काढून हा वाद कायमचा संपविण्याचा डाव आरोपीने रचला होता.

झारखंड येथील गावच्या 20 गुंठे जमिनीवरून वाद सुरू होते. त्यामुळे चुलत भावाचा काटा काढून हा वाद कायमचा संपविण्याचा डाव आरोपीने रचला होता.

झारखंड येथील गावच्या 20 गुंठे जमिनीवरून वाद सुरू होते. त्यामुळे चुलत भावाचा काटा काढून हा वाद कायमचा संपविण्याचा डाव आरोपीने रचला होता.

डोंबिवली, 19 नोव्हेंबर : झारखंडमधील (jharkhand) जमिनीच्या वादातून पुरण महतो या तरुणाची चुलत भावाने दगडाने ठेचून डोंबिवली (dombivali) शहरात हत्या केल्याचा घटना उघडकीस आली होती. अखेर या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी झारखंडमध्ये जाऊन आरोपी कालुकुमार महतो याला  अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे, आरोपीला झारखंड येथे अटक करण्यासाठी गेलेल्या मानपाडा पोलिसांवर (manpada police) दगडफेक करण्यात आली. पण, पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्याच. मूळ झारखंड इथे राहणारे पुरण महतो हा  हातमजुरीचे काम करण्यासाठी डोंबिवलीतील गोळवली गावात राहत होता. तर त्यांच्या शेजारी त्यांचे चुलत आरोपी भाऊ कालूकुमार आणि लालूकुमार हे दोघेही राहत होते.पुरण आणि कालूकुमार यांच्यात झारखंड येथील गावच्या 20 गुंठे जमिनीवरून वाद सुरू होते. त्यामुळे चुलत भावाचा काटा काढून हा वाद कायमचा संपविण्याचा डाव कालूकुमार आणि लालूकुमार यांनी आखला. 4 नोव्हेंबर रोजी या दोघांनी  पुरणला जेवण करण्यासाठी घरी बोलवले. दोघांनी पुरणला दारू पाजली त्याच्याशी भांडण करून त्याच्या डोक्यात दगड घालून तेथून पळून गेले. दरम्यान जखमी अवस्थेत एक तरूण पडला असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी पुरण ला रुग्णालयात दाखल केले. मात्र 8 नोव्हेंबर रोजी गंभीर जखमी पुरणचा सायन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. धक्कादायक ! राज्यातील प्राणी संग्रहालयांमधील तब्बल 200 प्राण्यांचा मृत्यू या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला. ही हत्या मालमत्तेच्या वादातून झाली असून चुलत भाऊ कालू कुमार आणि लालू कुमार यांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला. या दोघांच्या मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक दृष्ट्या तपास करत कल्याण नजीक असलेल्या म्हारलपासून ते सुरत भुसावळ या ठिकाणी या दोघांचा शोध घेण्यात आला. याच दरम्यान हे दोन्ही आरोपी मूळ गावी पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांचे एक पथक झारखंड येथील त्यांच्या मुळगावी दाखल झाले. कालूकुमारला ताब्यात घेतले असता गावातील स्थानिकाकडून पोलिसांचे पथक त्याला प्रचंड विरोध झाला. यावेळी ग्रामस्थांकडून पोलिसांच्या पथकावर  दगडफेकही करण्यात आली. मात्र मानपाडा पोलिसांच्या पथकाने मोठ्या साहसाने कालूकुमारला तेथून ताब्यात घेऊन अटक केली. 'बालाजी वाचव रे'; तिरुपतीच्या रस्त्यांवर पाण्याचं रौद्र रूप, VIDEO चिंता वाढवणार या गुन्ह्यातील दुसरा आरोपी लालकुमार हा अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटक कालूकुमार याला कल्याण न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २२ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Published by:sachin Salve
First published:

Tags: डोंबिवली

पुढील बातम्या