मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ठाण्यात डोंबिवलीतील घटनेची पुनरावृत्ती; चोरट्याने मोबाइल हिसकावला, धावत्या रिक्षातून पडून महिलेचा मृत्यू

ठाण्यात डोंबिवलीतील घटनेची पुनरावृत्ती; चोरट्याने मोबाइल हिसकावला, धावत्या रिक्षातून पडून महिलेचा मृत्यू

Representative Image 
Photo: Reuters

Representative Image Photo: Reuters

Thane woman dies after falling from auto: मोबाइल चोरट्यामुळे एका महिलेचा रिक्षातून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ठाण्यात घडली आहे.

ठाणे, 10 जून: महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डोंबिवलीतील महिलेचा मोबाइल चोरट्यामुळे (Mobile thief) मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता ठाण्यातही (Thane City) अशाच प्रकारे महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहेत. चोरट्याने मोबाइल हिसकावल्यानंतर ही महिला धावत्या रिक्षातून पडली आणि या घटनेत तिचा मृत्यू (Woman dies after falling from auto) झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्मिला रायसिंग या 27 वर्षीय महिला ठाण्यातून आपल्या मैत्रिणीसह बुधवारी रात्री घरी परतत होत्या. त्यांची रिक्षा ठाण्यातील तीन हात नाका परिसरात आली त्यावेळी एका चोरट्याने कन्मिला रायसिंग यांच्या हातातील मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मोबाइल हिसकावल्यावर कन्मिका यांनी तो मोबाइल पकडण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याचवेळी त्या रिक्षातून खाली पडल्या.

प्रेयसीच्या भावानं फोन करून बोलावलं, तीन दिवसांनी मिळाला तरुणाचा मृतदेह

धावत्या रिक्षातून पडल्याने कन्मिका यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान कन्मिका यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ठाण्यातील नौपाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

डोंबिवलीतील घटनेची पुनरावृत्ती

काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत राहणाऱ्या विद्या पाटील यांचाही अशाच प्रकारे लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अंधेरी येथे खाजगी कंपनीत कामाला असलेल्या विद्या पाटील या नुकत्याच बाळांतीन झाल्या होत्या बाळंतपणानंतर आपल्या तीन महिन्याच्या मुलीला घरी वडिलांकडे सोडून विद्या पाटील या कामाला जात होत्या. कुर्ला रेल्वे स्थानकावरून त्यांनी डोंबिवलीच्या दिशेने जाणारी रेल्वे गाडी पकडली त्यावेळेस महिला डब्यात चार ते पाच महिला प्रवासी होत्या. रेल्वे गाडी कळवा रेल्वे स्थानकावर पोहोचताच एका तरूणाने धावत रेल्वे गाडी पकडून विद्या पाटील बसलेल्या महिला प्रवाशांच्या डब्यात प्रवेश केला तो आतमध्ये तर त्याने विद्या पाटील यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस विद्या पाटील यांनी त्याला विरोध केला. यावेळी झालेल्या झटापटीत विद्या पाटील लोकलमधून खाली कोसळल्या. या घटनेत विद्या पाटील यांचा मृत्यू झाला.

First published:
top videos

    Tags: Crime, Thane