मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कल्याण-डोंबिवलीकरांनी करून दाखवलं, 6 महिन्याच्या बाळासह 20 जणांनी कोरोनाला हरवलं

कल्याण-डोंबिवलीकरांनी करून दाखवलं, 6 महिन्याच्या बाळासह 20 जणांनी कोरोनाला हरवलं

मुंबई आणि उपनगरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही दिलासादायक आहे.

मुंबई आणि उपनगरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही दिलासादायक आहे.

मुंबई आणि उपनगरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही दिलासादायक आहे.

डोंबिवली, 16 एप्रिल : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मुंबई आणि उपनगरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही दिलासादायक आहे. कल्याण आणि डोंबिवलीमध्ये आतापर्यंत 60 रुग्णांपैकी 20 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यात 6 महिन्याच्या बाळाचा समावेश आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील कोरोनाची लागण झालेले रुग्ण आता बरे होऊ लागले आहेत. आता पर्यंत 60 रुग्णांपैकी 20 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या चार ते पाच दिवसात जवळपास 9 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

हेही वाचा -चक्क स्वर्गरथ घेऊन रस्त्यावर उतरले यमराज, म्हणाले मास्क लावा..घरातच थांबा!

कोरोनावर मात करणारे 6 महिन्याचे बाळ सुद्धा बरे झाले आहे. त्याचे वडील सुद्धा बरे होऊन घरी आले आहेत. एवढंच नाहीतर या बाळाच्या आजीला सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. त्यांनीही कोरोनावर मात केली आहे. विशेष म्हणजे, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या सहा महिन्याच्या बाळाच्या प्रकृतीबद्दल त्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधला होता.

राज्यात 265 रुग्ण झाले बरे

तर दुसरीकडे राज्यात कोरोना चाचणीसाठी 52 हजार जणांचे नमुने पाठविण्यात आले असून आतापर्यंत 48 हजार 198 जणांचे कोरोना चाचणीचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर तीन हजरांच्या आसपास कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सुमारे 60 ते 70 टक्के जणांना लक्षणे दिसत नसून 25 टक्के जणांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत तर पाच टक्के पेक्षाही कमी रुग्णांची स्थिती गंभीर आहे.

हेही वाचा - 'तुम्ही सांगा फक्त कुठे आणि कधी?' पुणे पोलिसांचं उत्तर पाहून म्हणाल 'मानलं!'

एकीकडे ही आकडेवारी असली तरी कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्याचे प्रमाणही वाढत आहे. रुग्णांचा सकारात्मक प्रतिसाद, आरोग्य यंत्रणेचे परिश्रम यामुळे आतापर्यंत बाधित रुग्णांपैकी सुमारे 265 रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या या रुग्णांना दवाखान्यातून घरी सोडताना ठिकठिकाणी टाळ्यांच्या गजरात निरोप दिला जात असून समाजातूनही या रुग्णांचे स्वागत केले जात आहे.

कल्याण डोंबिवलीत 2 रुग्ण आढळले

दरम्यान, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत  आज नवीन 2 रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये कल्याण पश्चिममधील 33 वर्षीय आणि डोंबिवली पूर्व परिसरातील  49 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या दोन्ही रुग्णावर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

संपादन - सचिन साळवे

First published:

Tags: Corona, Dombivali, KDMC