डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी, कल्याण-शीळ रोडवर निळजे पूल 15 तारखेपासून बंद

डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी, कल्याण-शीळ रोडवर निळजे पूल 15 तारखेपासून बंद

सदर पुल सर्व प्रकारच्या वाहनांना 15 जूनपासून मध्यरात्री 12 वाजेपासून रहादरीस बंद करण्यात येत आहे.

  • Share this:

डोंबिवली, 09 जून : पनवेल-दिवा रेल्वे लाईनवरील, कल्याण-शीळ रोडवरील आणि टोल नाक्यापुढील जुना निळजे पूल येत्या 15 तारखेपासून वाहतूकीस बंद करण्यात येत आहे. त्यामुळे कल्याण-शीळ रोडवर रोजच्या होणाऱ्या वाहतुकीमध्ये भर पडणार आहे.

रेल्वे विभागाने पनवेल-दिवा रेल्वे लाईनवरील कि.मी. 47/6-7 जवळील जुन्या निळजे रेल्वे उड्डाणपूलाची आयआयटी या संस्थेमार्फत सुरक्षा तपासणी केली असता सदर संस्थेने तपासणी करून 'पुलाची सद्यस्थिती असुरक्षित असून पूल तात्काळ बंद करण्यात यावा' असा अहवाल दिला.

हेही वाचा -लेकीनं धरला प्रियकरासोबत लग्नचा हट्ट, आई-वडिलांना गर्भवती मुलीची केली हत्या

तसे रेल्वे विभागाने या विभागास कळवल्याने सदर पुल सर्व प्रकारच्या वाहनांना 15 जूनपासून मध्यरात्री 12 वाजेपासून रहादरीस बंद करण्यात येत आहे. तर कल्याण-शिळफाटा ये-जा करणारी वाहने बंद करण्यात येत असलेल्या जुन्या रेल्वे उड्डाण पुलास समांतर असलेल्या दुसऱ्या रेल्वे उड्डाण पुलावरून इच्छित स्थळी जातील, असे पत्रक काढले आहे.

हेही वाचा -जंगलातून हरीण शहरात आले आणि सोसायटीच्या गेटमध्येच अडकले, पुढे...

दरम्यान, आधीच पावसाळा तोंडावर आहे, त्यात संथ गतीने होणारे पत्रीपुलाचे काम आणि कल्याण -शिळ रस्त्याच्यास सहा पदरीकरणाचे कामही सुरू आहे. अशात या उड्डाणपुलावरील वाहतूक बंद झाल्यास वाहन चालकांना होणाऱ्या त्रासाची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी एमएमआरडीए कडे पत्रव्यवहार केला आहे. ट्रॅफिक पोलीस ,एमएमआरडीए अधिकारी यांनी एकत्रित पुलाचा पाहणी दौरा ठेवावा आणि जड-अवजड वाहतूक बंद करून, पुलाची तात्पुरत्या स्वरूपात योग्य डागडुजी करून हलक्या वाहनांसाठी पूल सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: June 9, 2020, 11:45 AM IST

ताज्या बातम्या