"डोकलाम हा छोटा भूकंप, चीनकडे दुर्लक्ष करून चालणार नाही"

एअर कंडिशन मधल्या अधिकाऱ्यांचा अहवालाची अंमलबजावणी करायला विरोध असेल यातील काहींनी तर आणखी एक समिती नेमा असा सल्ला दिला होता याकडेही शेकटकर यांनी लक्ष वेधले.

  • Share this:

31 आॅगस्ट : 1962 चं चीनशी युद्ध हा भूकंप होता तर डोकलाम हाही छोटा भूकंपच आहे. कधी लडाख कधी डोकलाम चीन भविष्यातही डोकं वर काढल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण गाफील राहून चालणार नाही. गाफील राहिलो तर कारगिल युद्धातून धडा शिकलो नाही असं होईल असा इशारा निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना दिला.

शेकटकर समितीच्या 199 पैकी 88 शिफारशी स्वीकारून त्यापैकी 65 शिफारशींवर 2019 पर्यंत अंमलबजावणी करणार असल्याच्या निर्णयाचं स्वागत करताना शेकटकर यांनी पर्रीकर, जेटली यांचं कौतुक केलं मात्र पूर्ण अंमलबजावणी करा अर्धवट नको,टक्केवारीचा निकष नको उरलेल्या 99 शिफारशीही स्वीकारा असं मत व्यक्त केलं.

एअर कंडिशन मधल्या अधिकाऱ्यांचा अहवालाची अंमलबजावणी करायला विरोध असेल यातील काहींनी तर आणखी एक समिती नेमा असा सल्ला दिला होता याकडेही शेकटकर यांनी लक्ष वेधले.

भारताची युद्धनीती ही दुसऱ्या महायुद्धानंतर जशी होती तशीच राहिली आहे,काळ बदलला आहे आपण अजूनही स्वदेशी बनावटीचा टँक ही बनवू शकलो नाही याबद्दल खंत व्यक्त करताना समितीच्या अहवालाच्या प्रभावी अंमलबजावणी नंतर भारताची लढाऊ क्षमता वाढेल मग पाक,चीन भारताचं वाकडे करू शकणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

समितीच्या 11 सदस्यांचा एकत्रित अनुभव 400 वर्षांचा आहे,लष्करातले अधिकारी,जवान,कारकून,कर्मचारी सगळ्यांशी बोलून भेटून अहवाल बनवला आहे.

गरज नसलेल्या गोष्टी बंद होतील, कुणाची नोकरी जाणार नाही पण कामाचं स्वरूप बदलेल असं त्यांनी सांगितलं. पहिल्या टप्प्यात 57 हजार अधिकारी आणि इतर रँकच्या जवानांची फेर रचना केली जाणार आहे, मिलिटरी फार्म बंद होणार आहेत, दारुगोळा विभागातील अधिकाऱ्यांचीही पुनर्रचना होणार आहे. युद्ध टाळणे म्हणजे युद्धास सदैव तयार असणे तत्पर असू तर युद्ध लादलं जात नाही असं सांगताना समितीच्या शिफाराशींमुळे जो पैसा वाचणार आहे तो संरक्षण खात्यातच वापरा दुसरीकडे वळवू नका असा सल्ला ही त्यांनी अर्थमंत्र्यांना दिलाय.

First published: August 31, 2017, 10:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading