• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • सिलिंडर मॅननंतर आता रायगडच्या Cylinder Woman नं वेधलं लक्ष; 20 वर्षांपासून सांभाळतीये घर अन् करिअर

सिलिंडर मॅननंतर आता रायगडच्या Cylinder Woman नं वेधलं लक्ष; 20 वर्षांपासून सांभाळतीये घर अन् करिअर

कल्पना हिलाल असं संबंधित खमक्या सिलिंडर वूमनचं नाव आहे. (फोटो-नवराष्ट्र)

कल्पना हिलाल असं संबंधित खमक्या सिलिंडर वूमनचं नाव आहे. (फोटो-नवराष्ट्र)

रायगड (Raigad) जिल्ह्याच्या नेरळ येथील एक महिला मात्र गेल्या वीस वर्षांपासून घरोघर जावून गॅस पोहोचवण्याचं काम करत आहेत. वडिलांचं डोक्यावरील छत्र हरवल्यानंतर बिथरलेल्या कुटुंबाला याच महिलेनं सावरलं आहे.

 • Share this:
  रायगड, 07 ऑक्टोबर: स्वयंपाक घरातील गॅस अचानक संपला तर, बहुतांशी महिला दुसरा गॅस जोडण्यासाठी आपल्या नवऱ्याची वाट पाहतात. तर एखादी गॅसची टाकी कंपनीतून भरून आणायची म्हटल्यावर भल्या भल्या पुरुषांना घाम फुटतो. पण रायगड (Raigad) जिल्ह्याच्या नेरळ येथील एक महिला मात्र गेल्या वीस वर्षांपासून घरोघर जावून गॅस पोहोचवण्याचं काम करत आहेत. वडिलांचं डोक्यावरील छत्र हरवल्यानंतर बिथरलेल्या कुटुंबाला याच महिलेनं सावरलं आहे. मागील वीस वर्षांपासून त्या न थकता आणि कुरकुर न करता आपलं काम प्रामाणिकपणे करत आहेत. यामुळे त्यांनी परिसरात सिलिंडर वूमन (Cylinder Woman) अशी ओळखच मिळवली आहे. कल्पना  हिलाल (Kalpana Hilal) असं संबंधित खमक्या सिलिंडर वूमनचं नाव आहे. त्या जेमतेम शिकलेल्या असून त्या दुसऱ्यांच्या घरात धुणी-भांडी करत स्वत:चा आणि कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवत आहेत. वीस वर्षांपूर्वी कल्पना यांच्या वडिलांच अचानक निधन झाल्यानंतर, स्वत:सह मोठी बहीण आणि आईचा उदरनिर्वाह कसा चालवायचा हा प्रश्न कल्पना यांना पडला होता. सुरुवातीच्या काळात त्यांनी दुसऱ्यांच्या घरी धुणी -भांडी करत कुटुंबाला हातभार लावण्याचा प्रयत्न केला. हेही वाचा-लघवीला गेला अन् 97 लाखांना मुकला; पुण्यातील व्यावसायिकासोबत घडली विपरीत घटना त्यानंतर त्यांनी घरगुती गॅस घरपोहोच करण्याचं काम स्वीकारलं. सुरुवातीच्या काळात त्या आपल्या सायकलवरून 5-7 सिलिंडर घरपोहोच करायच्या. त्यानंतर त्यांनी सेकंड हॅंड स्कूटर विकत घेत आपला संघर्ष सुरूच ठेवला. यानंतर आता त्या पूर्ण चारचाकी वाहनातील सिलिंडर गॅस देखील घरपोहोच करतात. जोर फक्त पुरुषी मनगटात असतो, या विचाराला कल्पना यांनी अवघ्या बाराव्या वर्षीच छेद दिला आहे. त्या वयाच्या बाराव्या वर्षांपासून विविध कामं करत आपल्या कुटुंबाला सावरत आहेत.  त्यांची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. हेही वाचा-अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून दोनदा बलात्कार; पोलिसांना भयावह अवस्थेत आढळला आरोपी याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितलं की, भरलेला गॅस घेऊन एक महिला घरी आल्याचं पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं. अशावेळी संबंधित गृहिणी आपुलकीनं चहा-पाण्यासाठी विचारतात. तसेच त्याच्या घरातील गॅस संपला तर हक्काने फोन करतात. यामुळे काम करण्यास प्रोत्साहन मिळतं.
  Published by:News18 Desk
  First published: