'शिकारी खुद्द शिकार...', कुत्र्यांचा बिबट्यावर हल्ला

'शिकारी खुद्द शिकार...', कुत्र्यांचा बिबट्यावर हल्ला

जखमी बिबट्याला माणिकडोह निवाराकेंद्रात उपचारासाठी घेऊन गेले.

  • Share this:

जुन्नर, 30 मे : बिबट्याने माणसांवर आणि प्राण्यावर हल्ला केल्याच्या बातम्या जुन्नरमध्ये नेहमी घडतात पण मंगळवारी रात्री एका बिबट्यावर कुत्र्यांनी हल्ला केला आणि यात हा बिबट्या जबर जखमी झालाय.

चाळकवाडी परिसरातील त्रिमूर्ती मळा या ठिकाणी  शेतकरी अनिल सोनवणे यांच्या शेतावर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या मेंढराच्या शिकारीसाठी आला होता. परंतु त्या बिबट्याला धनगराच्या कुत्र्यांनी पाहिले आणि पाठलाग केला.

कुत्र्यांनी त्याला गाठून एकच हल्ला चढवला, या धुमश्चक्रीत बिबट्या गंभीर जखमी झालं.

दरम्यान, या बाबतची माहिती वन विभागाला दिल्यावर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले आणि  जखमी बिबट्याला माणिकडोह निवाराकेंद्रात उपचारासाठी घेऊन गेले.

First published: May 30, 2018, 5:45 PM IST

ताज्या बातम्या