Home /News /maharashtra /

कुत्र्याने पाठलाग करून हरणाला ठार मारले, बारामती शिकारीची धक्कादायक घटना उघड

कुत्र्याने पाठलाग करून हरणाला ठार मारले, बारामती शिकारीची धक्कादायक घटना उघड

जैनकवाडी येथील पवारवस्तीच्या परिसरात शेतकरी आपली कामे करीत असताना त्यांना एक जखमी चिंकारा जातीचे हरणाचा शिकारी कुत्रा पाठलाग करताना दिसला.

बारामती, 10 जून : बारामती तालुक्यातील जैनकवाडी येथे चिंकारा हरणाची शिकार करण्यात आल्याची घटना उघडकीस  आली आहे. या प्रकरणी वन विभागाने गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.  पार्टीसाठी चिंकारा हरणाची शिकार केल्याचा संशय वनविभागाने व्यक्त केला असून गुन्हा दाखल केला आहे. तर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जैनकवाडी येथील पवारवस्तीच्या परिसरात शेतकरी आपली कामे करीत असताना त्यांना एक जखमी चिंकारा जातीचे हरणाचा शिकारी कुत्रा पाठलाग करताना दिसला. त्यांनी यावेळी त्याच्या मागे एक अनोळखी  व्यक्ती पळताना दिसला. त्या हरणाला मारुन कुत्रा बाजुला झाला. यावेळी संबंधित व्यक्तीला शेतकऱ्याने हटकले असता त्याने दमबाजी केली. यावेळी परिसरातील नागरिक जमा झाल्याने शिकाऱ्याने तेथून पळ काढला. याबाबतची माहिती बारामती वनविभागाला मिळताच त्यांनी घटनास्थळाला धाव घेऊन पंचनामा करुन संबंधितांवर वन पशुहत्या गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, हा प्रकार बारामतीत घडल्याने उपवनसंरक्षक लक्ष्मी, सहाय्यक वनसंरक्षक वैभव भालेराव, बारामतीचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपाल टी. जे. जराड, वनरक्षक श्रीमती कवितके, वनमजूर काळंगे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. हेही वाचा - एप्रिलमध्ये कोरोनामुक्त झालेल्या 'या' 5 राज्यांमध्ये पुन्हा वाढले रुग्ण बारामतीमधील  एमआयडीसी परिसर लगत,वंजारवाडी,कटफळ  जैनकवाडी चा काही परिसर येत असल्याने एमआयडीसी  परिसरातून अनेक जण शिकारीसाठी नेहमी  येत असल्याचा संशय  व्यक्त केला जात आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या