Home /News /maharashtra /

डॉक्टर मुलीचा कोरोना लस घेतल्यामुळे मृत्यू, सीरमविरोधात 1000 कोटींचा पित्याने केला कोर्टात दावा!

डॉक्टर मुलीचा कोरोना लस घेतल्यामुळे मृत्यू, सीरमविरोधात 1000 कोटींचा पित्याने केला कोर्टात दावा!

कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यामुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याने दिलीप लुणावत यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली

कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यामुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याने दिलीप लुणावत यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली

कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यामुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याने दिलीप लुणावत यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली

औरंगाबाद, 02 फेब्रुवारी: कोरोनाचा (corona) संसर्ग टाळण्यासाठी देशभरात लसीकरणावर भर दिला जात आहे. पण, लस घेतल्यामुळे अनेक जणांना त्रास झाल्याची प्रकरण समोर आली आहे. औरंगाबादेत (aurangabad) कोरोना लस  (corona vaccine) घेतल्यानंतर एका तरुणीचा मृत्यू झाला. लशीमुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या वडिलांनी केला असून लस उत्पादन कंपनीविरोधात 1000 हजार कोटींची दावा केला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा औरंगाबादच्या एका नागरिकांनी केला आहे. इतकंच नाही तर या पित्याने एक हजार कोटींचा दावा मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला आहे. दिलीप लुणावत असे याचिकाकर्त्यांचे नाव आहे. त्यांची मुलगी डॉ. स्नेहल लुणावत (Dr. Snehal Lunavat) नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील दंत महाविद्यालयात होती. स्नेहलने 28 जानेवारी 2021 रोजी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. परंतु 1 मार्च 2021 मध्ये तीच मृत्यू झाला. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस असुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. परंतु, हा दावा खोट्या व चुकीचा असल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचं याचिकाकर्त्याचे म्हणणं आहे. (WhatsApp वर एका सावधगिरीने टळला 90 हजारांचा Fraud,तुम्हीही या गोष्टी लक्षात ठेवा) कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यामुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याने दिलीप लुणावत यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत केंद्र सरकार, राज्य सरकार सोबत लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट (Serum Institute) आणि भागीदार यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. (पाकिस्तानात हिंदू व्यापाऱ्याची गोळ्या घालून हत्या, अगोदर मिळाली होती धमकी) केंद्र सरकारच्या एफईएफआय या समितीने मुलीची कोरोना लशीच्या दुष्पपरिणामांमुळे मृत्यू झाल्याचे मान्य केल्याचे याचिकेत नमूद केलं आहे. त्यामुळे आपल्या मुलीला न्याय मिळावा आणि इतर लोकांचे प्राण वाचावेत म्हणून याचिका दाखल केल्याचे लुणावत यांचं म्हणणं आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News, Corona, Corona vaccine, Covid-19, Death, Vaccine

पुढील बातम्या