गोविंद वाकडे (प्रतिनिधी)
पिंपरी-चिंचवड, 12 मे- सासरच्या छळाला कंटाळून स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विवाहितेचा शनिवारी अखेर मृत्यू झाला आहे. योगिता चौधरी असं मृत महिलेचं नाव आहे. पेशाने योगिता डॉक्टर होती.
शुक्रवारी संध्याकाळी योगिताचे घरच्यांशी वाद झाला. नंतर तिने मुंग्या मारण्याचं औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. नंतर मळमळू होऊ लागल्याने घराजवळील दुकानातून केरोसिन विकत आणून स्वतःला पेटवून घेतले होते. या घटनेत योगिता 100 टक्के भाजली. पुण्यातील खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.
दरम्यान योगिता हिच्या मृत्यूप्रकरणी पती चेतन चौधरी, सासू रजनी चौधरी आणि सासरे गोविंद चौधरी यांच्या विरोधात विवाहितेच्या छळ करणे आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी चेतन चौधरी, रजनी चौधरी आणि गोविंद चौधरी यांची प्रकृती बिघडल्याने ते सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर अटक केली जाईल, असे उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी सांगितले आहे.
SPECIAL REPORT: 'पोरांची पोटं दुखतात पण तरी मिळेल ते किडे पडलेलं पाणी प्यावं लागतं'