सीनिअर डॉक्टर्सच्या रॅगिंगला कंटाळून जळगावच्या विद्यार्थिनीची मुंबईत आत्महत्या

सीनिअर डॉक्टर्सच्या रॅगिंगला कंटाळून जळगावच्या विद्यार्थिनीची मुंबईत आत्महत्या

मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या आदिवासी तरुणीने सीनिअर डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून काल, (ता.23) रात्री मुंबई येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.

  • Share this:

राजेश भागवत (प्रतिनिधी),

जळगाव, 24 मे- सीनिअर डॉक्टर्सकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून जळगावच्या आदिवासी समाजाच्या विद्यार्थिनीची मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. डॉ.पायल तडवी असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. या प्रकरणी तीन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे हे प्रकरण?

मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या आदिवासी तरुणीने सीनिअर डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून काल, (ता.23) रात्री मुंबई येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत डॉक्टर तरुणीच्या आईने 10 मे रोजी राज्याचे आरोग्यमंत्री, पोलीस निरीक्षक,आग्रीपाडा पोलीस स्टेशन, भायखळा नायर हॉस्पिटल मुंबईच्या एच.ओ.डी. यांच्याकडे तक्रार दिली होती. परंतु प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेता कारवाई न झाल्याने नाहक या मुलीचा बळी गेल्याचं मृत विद्यार्थिनीची आई आबेदा तडवी यांनी म्हटले आहे.

मृतदेह आणला जिल्हाधिकारी कार्यालयात

संतप्त नातेवाईकांनी डॉ.पायलचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणून आंदोलन केले. कारवाईच्या मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

अपमानास्पद वागणुकीमुळे डॉ. पायलने संपवली जीवनयात्रा

अपमानास्पद वागणुकीचा त्रास असहाय्य झाल्याने डॉ.पायलने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. डॉ.पायल तडवी यांचा विवाह दोन वर्षापूर्वीच रावेर (जि.जळगाव) येथील मूळ रहिवासी असलेले भूलरोगतज्ज्ञ सलमान तडवी यांच्याशी झाले होते. प्रशासनाकडे तक्रार करूनही दखल न घेतल्याने पायलला आपले जीवन संपवावे लागले. त्यामुळे पायलचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले.

SPECIAL REPORT: औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला कसा लागला सुरूंग

First published: May 24, 2019, 1:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading