कोल्हापूरात डॉक्टरांनीच केली नवजात बालकांची तस्करी!

कोल्हापूरात डॉक्टरांनीच केली नवजात बालकांची तस्करी!

जिथं मुलांना जन्म दिला जायचा तिथंच हे नराधम जन्मलेल्या मुलांचा सौदा करायचे. गर्भवती कुमारी माता आणि विधवांच्या असहाय्यतेचा फायदा घेत त्यांच्या पोटी जन्मलेल्या बाळांची तस्करी केली जायची.

  • Share this:

08 फेब्रुवीरी : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीतल्या डॉ. अरुण पाटील यांच्या दवाखान्यावर केंद्रीय पथकानं छापा टाकून नवजात बालकांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

जिथं मुलांना जन्म दिला जायचा तिथंच हे नराधम जन्मलेल्या मुलांचा सौदा करायचे. गर्भवती कुमारी माता आणि विधवांच्या असहाय्यतेचा फायदा घेत त्यांच्या पोटी जन्मलेल्या बाळांची तस्करी केली जायची.

डॉ. अरुण पाटलाच्या या लांच्छनास्पद प्रकारानंतर इचलकरंजीत एकच खळबळ उडालीय. या तस्करीची पाळंमुळं देशभरात पसरल्याचं कळतंय.

इचलकरंजीतील या घटनेनं वैद्यकीय क्षेत्रावर खाली मान घालायची वेळ आलीय. या हॉस्पिटलमधून आजवर अनेक बालकांची विक्री झाल्याची शक्यता असून देशातल्या या मोठ्या रॅकेटची पाळंमुळं खणून काढणं गरजेचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2018 09:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading