रवी सपाटे, गोंदिया 22 ऑक्टोबर : चार महिन्यांच्या एका चिमुकलीच्या अन्ननलिकेत चक्क 6 दगड अडकल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात येत असलेल्या अतिदुर्गम नक्षलग्रस्थ भागातील लटोरी या गावातील आहे. जेव्हा या मुलीचे एक्सरे आणि सीट स्कॅन केलं गेलं तेव्हा मोठी खळबळ उडाली. गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयातील डॉ. विकास जैन यांनी त्या मुलीचं ऑपरेशन करत अन्ननलिकेत अडकलेले 6 दगड ऑपरेशन करत बाहेर काढले. आता या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.
स्वतःच्या डोळ्यातली बुब्बुळं बाहेर काढणारा माणूस पाहिलात? गिनीज बुकने घेतली दखल
या चार महिन्याच्या चिमुकलीला खोकला येत होता. त्यामुळे पालकांनी तिला गावाकडील उपचार म्हणून खेकड्याचा ज्युस पिण्यासाठी दिला. मात्र, त्यानंतरही त्या चिमुकलीचा खोकला थांबला नाही. ती सतत रडत असल्याने पालकांनी तिला गोंदिया येथील डॉक्टरांना दाखविले. त्यानंतर डॉक्टरांनी तिचे एक्सरे काढले. यामध्ये अन्ननलिकेत काहीतरी अडकल्याचं दिसून आलं.
हे पाहून डॉक्टरांनी त्या चिमुकलीचं सिटी स्कॅन केलं. तेव्हा समजलं की मुलीच्या अन्ननलिकेत दगड अडकले आहेत. डॉ. विकास जैन यांनी ऑपरेशन करत त्या मुलीच्या अन्ननलिकेत अडकले सगळे 6 दगड काढले आहेत. यानंतर आता या मुलीची स्थिती स्थिर आहे.
Dengue Fever : 'या' लोकांसाठी डेंग्यू ठरू शकतो जीवघेणा, वेळीच घ्या काळजी
चिमुकलीचं ऑपरेशन दीड तासात पूर्ण झालं असून त्या मुलीचे पालक गरीब कुटुंबातील असल्याने डॉ. विकास जैन यांनी ऑपरेशनचे पैसेही घेतले नाही.. यामुळे मुलीच्या पालकांना फक्त औषधांचा खर्च करावा लागला. मात्र एवढ्या लहान मुलीच्या अन्ननलिकेत हे दगड गेले कसे? हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news, Shocking news