Home /News /maharashtra /

सांगली: पेशाने डॉक्टर अन् धंदा सावकारीचा; गरजूंना वेठीस धरणाऱ्या उच्चशिक्षित दाम्पत्याला अटक

सांगली: पेशाने डॉक्टर अन् धंदा सावकारीचा; गरजूंना वेठीस धरणाऱ्या उच्चशिक्षित दाम्पत्याला अटक

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Crime in Sangli: सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील पेशाने डॉक्टर असणाऱ्या दाम्पत्याने खाजगी सावकारीचा उद्योग सुरू करत एकाची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी दाम्पत्याला बेड्या ठोकल्या आहेत.

पुढे वाचा ...
    वाळवा, 16 जानेवारी: महाराष्ट्रासह देशात खाजगी सावकारी करणं बेकायदेशीर आहे. असं असताना देखील राज्यात खाजगी सावकारीची (Private money lender) अनेक प्रकरणं समोर येत आहेत. राजकीय वजन असणाऱ्या लोकांकडून हा धंदा सर्रासपणे सुरू असतो. संबंधित लोकांकडून गरजू लोकांना वेठीस धरून दंडेलशाही चालवली जाते. व्याज आणि मुद्दलपेक्षा अधिक रक्कम वसूल केली जाते. अशी अनेक प्रकरणं यापूर्वी समोर आली आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील पेशाने डॉक्टर असणाऱ्या दाम्पत्याने खाजगी सावकारीचा उद्योग केला आहे. त्यांनी एका फिर्यादी व्यक्तीकडून व्याजासह सर्व मुद्दल वसूल केल्यानंतर आगाऊ पैशांची मागणी करत फिर्यादीचा 20 गुंठ्याचा प्लॉट बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून संबंधित व्यक्तीने आष्टा पोलिसांत धाव घेतली आहे. पोलिसांनी अवैध सावकारीसह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत वाळवा येथील रहिवासी असणाऱ्या आरोपी डॉक्टर दाम्पत्याला अटक केली (Doctor couple arrested) आहे. हेही वाचा- सावधान! अ‍ॅप डाऊनलोड करताच बँक खातं झालं रिकामं; औरंगाबादेत सेवानिवृत्त फौजदाराला 10 लाखांचा गंडा डॉ. अनिल खुंटाळे आणि त्यांची पत्नी डॉ. रुपाली खुंटाळे असं आरोपी दाम्पत्याचं नाव आहे. त्यांचा वैद्यकीय व्यवसाय असून ते व्याजाने पैसे देण्याचं कामही करतात. याप्रकरणी वाळवा येथील संजय बंडा नायकवडी यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपी डॉक्टर दाम्पत्याने फिर्यादी संजय नायकवडी यांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. आरोपींनी 18 लाख 50 हजार रुपये व्याजाने देऊन त्यांची वाळवा येथील मिळकतीचे खरेदी पत्र तयार करून घेतलं आहे. हेही वाचा-दागिन्यांपुढे माणुसकी हरली; रत्नागिरीत 3 वृद्धांचा खून करून केलं आगीच्या हवाली यानंतर, फिर्यादीने आरोपी डॉक्टर दाम्पत्याचे सर्व पैसे व्याजासह परत केल्यानंतरही, आरोपींनी आणखी साडेतीन लाखांची मागणी केली. तसेच हे पैसे वसूल करण्यासाठी आरोपींनी फिर्यादीच्या नावावरील 20 गुंठ्याचा प्लॉट बळवाकवण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर संजय नायकवडी यांनी आष्टा पोलीस ठाण्यात धाव घेत, फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी दाम्पत्याला बेड्या ठोकल्या असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Sangli

    पुढील बातम्या