मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाराष्ट्रासाठी संतापजनक बातमी, डॉक्टर नववधूची होणार होती कौमार्य चाचणी!

महाराष्ट्रासाठी संतापजनक बातमी, डॉक्टर नववधूची होणार होती कौमार्य चाचणी!

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

बेडशीटवर रक्त पडलेल असेल तर वर मुलगा पंचायती समोर जाऊन 'समाधान झाले समाधान झाले' असं म्हणतो

पुणे, 22 नोव्हेंबर : जात-पंचायतींच्या (jaat Panchayat) लढ्या सोबतच आणखी एक महत्वाची आणि अत्यंत भूषण अशी कुप्रथा गेली कित्येक वर्ष थांबवली जात नाहीये ही प्रथा आहे कौमार्य (virginity test) चाचणीची. एकविसाव्या शतकातही लग्न झाल्यावर ती वधूचे कौमार्य अबाधित आहे की नाही याची चाचणी घेतली जात असल्याची घटना नाशिकमध्ये (nashik) समोर आली आहे. एका उच्च शिक्षित डॉक्टर वधूला ( doctor bride) या भयावह प्रथेला सामोरं जाव लागलं. पण, वेळीच अंनिसच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे हा डॉक्टर वधूवरचा हा प्रसंग थोडक्यात टळला आहे.

नाशिकमध्ये अलीकडे अशी घटना समोर आली आहे. डॉक्टर असलेली वधू आणि अमेरिकन नेव्हीमध्ये असलेल्या अधिकारी वराचा धुमधडाक्यात विवाह सोहळा पार पडला. साहजिक दोन्ही कडील कुटुंब हे उच्चशिक्षित आहे. पण, तरीही डॉक्टर असलेल्या वधूला कौमार्य परीक्षेला सामोरं जाण्याचा बाका प्रसंग उभा राहिला.

आता No क्वारंटाइन! Covaxin घेतलेल्या प्रवाशांना ब्रिटनमध्ये येण्यास परवानगी

पण अंनिसचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी याची माहिती मिळाली आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कौमार्य चाचणी होण्यापासून रोखण्यात आलंय. मात्र कुटुंबाच्या दबावापोटी मुलीने आपली कुठलीही तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले. यात सुदैवाने एवढंच की या मुलीला मानसिक खच्चीकरण करणाऱ्या कौमार्य चाचणीला सामोर जाव लागल नाही, असं कृष्णा चांदगुडे कार्यकर्ता अनिस यांनी स्पष्ट केलंय.

वधू आणि वरांकडील महिला बेडशीटवर रक्त पडलेल असेल तर वर मुलगा पंचायती समोर जाऊन 'समाधान झाले समाधान झाले' असं म्हणतो. हा सगळा प्रकार म्हणजे वधूने लग्नापूर्वी कुणाही सोबत शारीरिक संबंध ठेवलेले नसून ती पवित्र आहे, अशा भंपक विचारांचा पुरावा समजला जातो. या प्रकाराने अशा उच्चशिक्षित महिलांच्या मनोबला ची काय अवस्था होत असेल याचा विचार जातपंचायतीच्या मठ्ठ पंचांना कधीच डोक्यात का येत नसेल, असा सवाल अनिस च्या नंदिनी जाधव यांनी विचारला आहे.

नशीब चांगलं म्हणून तो अजून टीममध्ये', गंभीरचा दिग्गज भारतीय खेळाडूवर निशाणा

कंजारभाट समाजामध्ये घेतल्या जाणाऱ्या या कौमार्य चाचणीच्या विरोधात गेली दहा वर्ष या समाजातील अनेक तरुणांनी आवाज उठवला आहे. जे कुटुंब या कौमार्य चाचणीला तयार नसतात त्या कुटुंबांना जातपंचायतीकडून वाळीत टाकण्यात येतं. त्यांचा सामाजिक बहिष्कार केला जातो आणि याच दबावापोटी अनेक शिकलेली मंडळीही या खुप प्रार्थना बळी पडतात. मात्र आता या समाजातील सुशिक्षित मुला-मुलींनी पुढे येत या प्रथेला जोरदार विरोध केला आणि सुरू केली आहे 'स्टॉप व्हीं रीच्वल' नावाची चळवळ विवेक तमाईचीकर हे असेच समाजातून विद्रोह करून पुढे आलेले तरुण या चळवळीसाठी पुढाकार घेतला आहे.

सगळ्यात दुर्दैवी बाब म्हणजे, अगदी मंत्रालयात वरिष्ठ अधिकारी असलेल्या इंद्रजीत नावाच्या अधिकाऱ्याला ही या कंजारभाट समाजाच्या जातपंचायतीच्या सामाजिक बहिष्काराला बळी पडाव लागल होतं. तेव्हापासून इंद्रेकर यांनी ही आपल्या समाजात असलेल्या अनिष्ठ रूढी आणि प्रथमच या विरोधात जोरदार आवाज उठवला आहे.

First published:

Tags: Nashik