धुळे, 23 मे : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस आहे. त्यामुळे प्रत्येक घरात कोरोनाची भीती नागरिकांमध्ये दिसत आहे. लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत हा परिणाम दिसून येत आहे. दरम्यान या कोरोनाच्या संकटात आशेचा किरण दाखविणाऱ्या डॉक्टरांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. धुळ्यातील बालरोगतज्ज्ञ डॉ. अभिनय दरवडे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
त्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी त्यात आपलं अनुभवदेखील कथन केलं आहे. त्यांच्या रुग्णालयातील एका बाळाला झोपच येत नव्हती. या बाळाचा ऑक्सिजनही कालच काढला होता. शिवाय बाळ आईचं दूधही पिऊ लागलं आहे. त्यामुळे चांगलीच ताकद आली आहे. मात्र हे बाळ मोठ्याने रडत होतं. काही केल्या गप्प बसेना. आजूबाजूच्या बाळांनाही त्रास द्यायला लागला. अशावेळी डॉ. अभिनय दरवडे यांनी बाळाला केबिनमध्ये नेलं. त्याला छान दोन-तीन गाणी गाऊन दाखवली. बाळ शांतपणे गाणी ऐकत होतं. गाणी ऐकता ऐकताचं ते झोपी गेलं. अशा शब्दात अंगावर काटा आणणारा अनुभव डॉक्टरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.
हे ही वाचा-VIDEO : Lockdown मध्ये बाहेर जाऊन खाण्याची इच्छा? या तरुणांनी केला भारी जुगाड
धुळ्याच्या या डॉक्टरांना हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्यांनी हिंदी चित्रपटातील इस मोड पे जाते है, हे गाणं गायलं आहे. कोरोनाच्या संकटात हा हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहून तुमचा ताण हलका होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Dhule, Video viral