भावाला पैसे आणण्यासाठी घरी पाठवून अल्पवयीन रुग्ण मुलीवर डॉक्टरचा अत्याचार

भावाला पैसे आणण्यासाठी घरी पाठवून अल्पवयीन रुग्ण मुलीवर डॉक्टरचा अत्याचार

कोरोनाच्या महामारीत जगभर डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवत आहेत. मात्र, वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना भिवंडीत घडली आहे.

  • Share this:

भिवंडी, 6 ऑगस्ट: कोरोनाच्या महामारीत जगभर डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवत आहेत. मात्र, वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना भिवंडीत घडली आहे. एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरनं अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या आईनं तक्रारीवरून नराधम डॉक्टरच्या विरोधात विविध कलमांतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.

हेही वाचा...पुण्यात पोलिसांच्या वेशात दरोडेखोर, ज्वेलरी शॉपवर गोळीबार करून लुटून नेलं सोनं

आई आणि पीडित मुलीची तब्बेत बरी नसल्यानं दोघी गुलजार नगर येथील डॉ. बदरुजमा खान याच्याकडे उपचारासाठी गेल्या होत्या. यावेळी डॉक्टरने दोघींनाही तपासून व उपचार करून परत दुसऱ्या दिवशी तपासण्यासाठी बोलावले होते. दरम्यान, मुलीची तब्बेत बरी नव्हतीच. मात्र घरी काम असल्यामुळे मुलीच्या आईने तिच्यासोबत भावाला पाठवलं दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान डॉ. बदरुजमा खान याने मुलीचा तपासणीचा नंबर येऊनही तिला तपासले नाही. तिला सर्वात शेवटी तपासण्यासाठी बोलावलं. दवाखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला देखील कामानिमित्त बाहेर पाठवलं. मुलीसोबत सिबत गेलेल्या लहान भावाला पैसे सुट्टे आणण्याच्या बहाण्याने घरी पाठवले. या दरम्यान दवाखान्यात कुणीही नसल्याचा फायदा उचलत नराधम डॉक्टरनं मुलीवर अत्याचार केला.

सदर प्रकार पीडित मुलीने आपल्या मावशीला सांगितला असता मावशीला धक्काच बसला. व तिने पीडित मुलीच्या आईला आपल्या घरी बोलावून सदरचा प्रकार कथन केला. याप्रकरणी मुलीच्या आईने घटनेच्या पाच दिवसानंतर 4 ऑगस्ट रोजी शांतीनगर पोलीस ठाण्यात नराधम डॉक्टरबाबत तक्रार दिली.

हेही वाचा...दिल्ली पुन्हा हादरली! 13 वर्षीय मुलीवर तिच्याच घरात बलात्कार करून भोसकली कात्री

या घटनेची गंभीर दखल घेत शांतीनगर पोलिसांनी डॉक्टरविरुद्ध भादंवि कलम 354 ( ए ) , 376 (2)( इ) , 376 (सी) ( डी) सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, डॉक्टरला अजूनही अटक केली नसून याप्रकरणाची चौकशी सुरु असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांनी दिली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: August 6, 2020, 8:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading