• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • विकेंडला कास पठारावर जाण्याचा प्लॅन करताय? मग हे वाचाच; काय आहेत नियम?

विकेंडला कास पठारावर जाण्याचा प्लॅन करताय? मग हे वाचाच; काय आहेत नियम?

निसर्गातील मोकळी हवा घेण्यासाठी अनेकांनी कास पठार गाठलं आहे. पण कोरोना नियम आणि लॉकडाऊनचं उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नियम (rules) माहित असणं आवश्यक आहे.

 • Share this:
  सातारा, 27 जून: मागील काही दीड वर्षांपासून देशात कोरोना विषाणूनं (Corona pandemic) थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेकांना घराबाहेर मोकळा श्वासही घेता येत नाही. मागील काही महिन्यांपासून सततच्या लॉकडाऊनमुळे (Lockdown)अनेकजण घरात बंदिस्त झाले आहेत. त्यामुळे आता पावसाळाच्या तोंडावर अनेक पर्यटकांना साताऱ्याचं कास पठार (kaas Plateau) खुनावत आहे. अनेकांनी निसर्गातील मोकळी हवा घेण्यासाठी कास पठार गाठलं. कोरोना नियम आणि लॉकडाऊनचं उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही विकेंडला कास पठारावर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल. नियम (rules) माहित असणं आवश्यक आहे. जागतिक वारसा स्थळ असलेलं कास पठार, कास तलाव यांच्यासोबतच मान्सूनच्या दमदार आगमनामुळे धो धो कोसळणारा भारतातील सर्वात उंच वजराई भांबवली धबधबा, एकीवचा पाबळ धबधबा लोकांसाठी आकर्षण ठरत आहे. कितीही इच्छा असली तरी याठिकाणी पर्यटनासाठी जाता येत नाहीये. त्यामुळे अनेक पर्यटकांचा हिरमोड होतं आहे. कास पठारावर अद्याप फुलं उमलली नाहीत. पण मान्सूनच्या सुरुवातीला धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. पण कोरोना नियमांमुळे त्यांना पुढे जाता येत नाही. विकेंड लॉकडाऊनमुळं पोलिसांनी कास पठार परिसरात येणाऱ्या नागरिकांवर अटकाव केला आहे. त्यामुळे निसर्गरम्य पर्यटनापासून सातारकरांसोबत राज्यातील अनेकांना वंचित राहावं लागत आहे. सातारा जिल्हा प्रशासनानं अनलॉकला सुरुवात केली आहे. पण अद्याप पर्यटन स्थळं खुली करण्याची मुभा देण्यात आली नाही. थोड्याफार प्रमाणात तुम्ही घराबाहेर पडत असाल. पण विकेंडला कास पठारावर फिरायला जाण्याचं धाडस अजिबात करू नका. हेही वाचा- सिंहगडावर जाण्याचा प्लॅन करताय? मग हे वाचाच; अन्यथा भरावा लागेल आर्थिक भुर्दंड कारण तुम्हाला आल्यापावली परत जावं लागू शकतं. शिवाय कास पठार परिसरात फिरायला येणाऱ्या नागरिकांना आर्थिक दंडही ठोठावला जात आहे. पोलिसांच्या अटकावामुळे जवळपास राहणाऱ्या लोकांनाही या स्थळांना भेटी देता येत नाहीत. शनिवारी आणि रविवारी विकेंडलाही त्यांना पर्यटनापासून वंचित राहावं लागत आहे. परंतु सोमवार ते शुक्रवार नियमात शिथीलता असताना ही पोलीस अटकाव करत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी पसरत आहे.
  Published by:News18 Desk
  First published: